प्रगती एक्स्प्रेस विस्टाडोम डब्ब्यांसह पुन्हा रुळावर धावणार!

    19-Jul-2022
Total Views | 83

exp
 
मुंबई : कोरोना काळात बंद करण्यात आलेली प्रगती एक्स्प्रेस २५ जुलै पासून नव्या रूपात प्रवाशांसाठी सज्ज होणार आहे. मध्य रेल्वेने प्रवाशांसाठी मुंबई- पुणे-मुंबई मार्गावर सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. गाडी क्रमांक १२१२५ सीएसएमटी येथून सायं. ४:२५ वाजता सुटेल. पुणे येथे सायं. ७:५० वाजता पोहचेल. तर गाडी क्रमांक १२१२६ पुणे येथून सकाळी ७:५० वाजता सुटेल, आणि सकाळी ११:२५ वाजता सीएसएमटी ला पोहोचेल. ही एक्स्प्रेस दादर, ठाणे, पनवेल, कर्जत, लोणावळा, शिवाजी नगर येथे थांबेल.
 
 
प्रगती एक्स्प्रेस पुन्हा नव्याने सुरु करताना विस्टाडोम डबा (पारदर्शक काचेचा डब्बा)जोडण्यात येणार आहे. या गाडीला ११ द्वितीय श्रेणीचे आसन डबे जोडण्यात आले आहेत. यातील पाच डबे आरक्षित आणि चार अनारक्षित, एक डबा पासधारकांसाठी आणि एक महिलासाठी राखीव असणार आहे. एका वातानुकूलित आसन डबाचाही समावेश आहे. एक जनरल द्वितीय श्रेणी डबाही जोडण्यात आला आहे. या गाडीचे आरक्षण २० जुलैपासून उपलब्ध आहे.
 
 
काचेच्या छताशिवाय रुंद खिडक्या, एलईडी दिवे, उत्तम आसन व्यवस्था, जीपीएस आधारित माहिती प्रणाली, एलईडी स्क्रिन, दिव्यांगांसाठी रुंद सरकते दरवाजे अशा अनेक सुविधांचा त्यात समावेश आहे.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121