१५ आणि १६ जूनला ठाण्यातील काही भागांत पाणीपुरवठा बंद

टप्प्याटप्प्याने एक वेळ पाणीपुरवठा सुरू ठेवणार

    14-Jun-2022
Total Views | 61

thane 2
 
 
 
 
ठाणे : ‘स्टेम वॉटर डिस्ट्री. अ‍ॅण्ड इन्फा. कं. प्रा. लि.’ यांच्यावतीने पावसाळ्याअगोदर दैनंदिन देखभाल-दुरूस्तीची अत्यावश्यक कामे करण्यात येणार आहेत. त्यामुळे बुधवार, दि. १५ जून रोजी सकाळी ९ ते गुरुवार दि. १६ जून रोजी सकाळी ९ वाजेपर्यंत २४ तास ठाणे महापालिकेला होणारा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. दरम्यान, ठाणे महापालिकेच्या स्वतःच्या पाणीपुरवठा योजनेचे नियोजन करून टप्प्याटप्प्याने एक वेळ पाणीपुरवठा सुरू ठेवण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
 
 
 
त्यानुसार घोडबंदर रोड, पातलीपाडा, पवारनगर, कोठारी कम्पाउंड, आझादनगर, डोंगरीपाडा, वाघबीळ इत्यादी ठिकाणचा पाणीपुरवठा बुधवारी सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत बंद राहील. तसेच, समतानगर, ऋतुपार्क, सिद्धेश्वर, ईटरनिटी, जॉन्सन, जेल, साकेत, उथळसर, रेतीबंदर, कळवा व मुंब्राचा काही भाग याठिकाणी बुधवारी रात्री ९ ते गुरुवारी सकाळी ९ वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार आहे. या ‘शटडाऊन’मुळे पाणीपुरवठा पूर्वपदावर येईपर्यंत पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालिका क्षेत्रातील नागरिकांनी पाण्याचा योग्य तो साठा करून ठेवावा व ठाणे महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन ठाणे महानगरपालिकेच्यावतीने नागरिकांना करण्यात आले आहे.
 
 
 
 
 
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121