नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ’आत्मनिर्भर भारत’ या संकल्पनेला मोठ्या प्रमाणात चालना देण्यासाठी, संरक्षण मंत्रालयाने मंगळवारी भारतीय वायुदल आणि भारतीय नौदलासाठी हवेतून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र अस्त्र ‘एमके ख बियॉन्ड व्हिज्युअल रेंज’ आणि संलग्न उपकरणांच्या खरेदीसाठी ‘भारत डायनॅमिक्स लिमिटेड’ (बीडीएल) सोबत खरेदी श्रेणीअंतर्गत २,९७१ कोटी रुपये खर्चाच्या करारावर स्वाक्षरी केली.
‘बीव्हीआर’ क्षमतेसह हवेतून हवेत मारा करणारे हे क्षेपणास्त्र, लढाऊ विमानांना, जे प्रतिद्वंद्वी हवाई संरक्षण उपायांना न जुमानता शत्रूच्या विमानांना निष्प्रभ करू शकणारे ‘लार्ज स्टॅण्ड ऑफ रेंजेस’ प्रदान करते आणि हवाई क्षेत्रावर प्रभुत्व मिळवू शकते. हे क्षेपणास्त्र तंत्रज्ञान आणि आर्थिकदृष्ट्या अशा अनेक आयातीत क्षेपणास्त्र प्रणालींपेक्षा श्रेष्ठ आहे. भारतीय वायुदलाने यापूर्वीच या क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचण्या केल्या आहेत आणि ते ‘सुखोई’ लढाऊ विमानात पूर्णपणे जोडण्यात आले आहे आणि ‘लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्ट’ (तेजस) सह इतर लढाऊ विमानांमध्ये टप्प्याटप्प्याने बसवण्यात येईल. भारतीय नौदल या क्षेपणास्त्राचे ‘मिग २९के’ लढाऊ विमानावर एकात्मिकरण करणार आहे.