पंतप्रधान मोदींनी देशाच्या राजकीय संस्कृतीमध्ये परिवर्तन घडविले – जगतप्रकाश नड्डा

- ‘मोदी है तो मुमकिन है’ हा देशातील नागरिकांचा आत्मविश्वास - ‘इंडिया फर्स्ट’द्वारे परराष्ट्र धोरणात मोठे यश - समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचविण्यात यश

    30-May-2022
Total Views | 59


bjp
 
 
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील राजकीय संस्कृती बदलली आहे. देशातील राजकारणास घराणेशाही, लांगुलचालन, जातीयतेतून भारतीय राजकारणास बाहेर काढून विकासाच्या राजकारणावर नेण्याचे काम पंतप्रधानांनी केले आहे. यामुळे चौफेर विकास होत असून ‘मोदी है तो मुमकीन है’ हा आज देशातील नागरिकांच्या आत्मविश्वासाचा मंत्र बनला आहे, असे प्रतिपादन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांनी सोमवारी पत्रकारपरिषदेत केले.
 
 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारला आठ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांनी पत्रकारपरिषदेस संबोधित केले. यावेळी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, धर्मेंद्र प्रधान, अनुराग ठाकूर, राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह, सी. टी. रवी, तरुण चुघ, माध्यम प्रभारी अनिल बलुनी उपस्थित होते.
 
 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील राजकीय संस्कृती बदलण्यास प्रारंभ केला आहे. त्यांनी भारतीय राजकारणातील घराणेशाही, लांगुलचालन आणि जातीयवादास आव्हान देऊन विकासाचे राजकारण रुजविण्यास यश मिळविले आहे. राजकारणासोबतच पंतप्रधान मोदी यांनी प्रशासनाची कार्यशैली बदलून धोरणलकव्यातून बाहेर काढण्याचे काम केले आहे. त्यामुळे देशात २०१४ पूर्वीची धोरणलकव्याची परिस्थिती बदलून समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत अंत्योदयाच्या संकल्पानुसार विकास पोहोचण्यास प्रारंभ झाला आहे. यामुळे देशातील नागरिकांचाही आत्मविश्वास वाढला असून ‘मोदी है तो मुमकिन है’ हा नागरिकांचा मंत्र झाल्याचे जगतप्रकाश नड्डा म्हणाले.
 
 
 
‘सेवा, सुशासन आणि गरिब कल्याण’ हा मोदी सरकारचा आत्मा असल्याचे नड्डा यांनी यावेळी सांगितले. ते पुढे म्हणाले, परराष्ट्र धोरणामध्ये इंडिया फर्स्ट धोरणाद्वारे भारताचा दबदबा मोदी सरकारने निर्माण केले आहे. करोना संकट आणि युक्रेन संकटातही भारतीय अर्थव्यवस्थेची वेगवान आगेकूच सुरूच आहे. भारताची निर्यात वाढली आहे, परकीय चलनाची गंगाजळी वाढली आहे, परकिय गुंतवणुकीमध्ये भरघोस वाढ होत आहे. सरकारची योजनांची घोषणा आणि अंमलबजावणी यशस्वीपणे होत आहे. राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने सीमावर्ती भागांमध्ये रस्त्यांसह पायाभूत सुविधांचे जाळे निर्माण केले जात आहे. ईशान्य भारतातील वादांचे निराकरण झाले आहे, त्यामुळे गेल्या आठ वर्षांमध्ये मोदी सरकारने देशाच्या सर्वांगिण विकासासाठी काम केले असल्याचेही नड्डा यांनी यावेळी सांगितले.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
जयंत पाटील यांनी राजीनामा दिला, की घेतला? - चर्चांना उधाण; शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष, रोहित पवारांचे स्वप्न पुन्हा भंगले

जयंत पाटील यांनी राजीनामा दिला, की घेतला? - चर्चांना उधाण; शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष, रोहित पवारांचे स्वप्न पुन्हा भंगले

स्थानिक स्वराज्य संस्थांचा बिगुल वाजला असताना, शरद पवारांनी अचानक प्रदेशाध्यक्ष बदलल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ७ वर्षे एकहाती पक्ष सांभाळणाऱ्या जयंत पाटलांनी अचानक राजीनामा द्यावा आणि तो शरद पवारांनी स्वीकारावा, इतक्यापुरती ही घटना मर्यादीत नाही. त्यामुळे हा राजीनामा खरोखरच स्वेच्छेने दिला गेला की पक्षातील गटबाजीमुळे त्यांना हटवण्यात आले, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. दुसरीकडे, शशिकांत शिंदे यांच्या गळ्यात प्रदेशाध्यक्ष पदाची माळ पडली असली, तरी रोहित पवार आणि समर्थकांत भलती नाराजी पसरल्या..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121