राजकारणा बरोबर अन्य क्षेत्रांत संपर्क वाढवा: अनुराग ठाकूर

    29-May-2022
Total Views | 59

Anurag Thakur  

 
 
 
 
 
पुणे : स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी राजकारणाबरोबर कार्यकर्त्यांनी अन्य क्षेत्रांत संपर्क वाढवला पाहिजे,असे मत केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी व्यक्त केले. ठाकूर विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने पुणे दौऱ्यावर होते. त्या वेळी सर्किट हाऊस येथे भाजपच्या कार्यकर्त्यांशी ते संवाद साधत होते.

 
भाजपचे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक, आमदार माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, सुनील कांबळे, सिद्धार्थ शिरोळे, संघटन सरचिटणीस राजेश पांडे, प्रभारी. धीरज घाटे, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, सरचिटणीस गणेश घोष, दीपक नागपुरे, राजेश येनपुरे, दीपक पोटे, अर्चना पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
 

ठाकूर म्हणाले, राज्यात भाजपला काम करण्यासाठी चांगली परिस्थिती आहे. कोणत्याही पदावर भाजपचा पदाधिकारी असला तरी त्याने राजकारण करीत असताना त्याने खेळा सारख्या अन्य क्षेत्रात ही काम करावे, ज्यामुळे पक्षाचा पाया व्यापक होऊन जनाधार वाढण्यास मदत होईल. मुळीक यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केले, पांडे यांनी परिचय आणि सूत्रसंचालन आणि पोटे यांनी आभार मानले.




 
अग्रलेख
जरुर वाचा
सामान्य तिकीट घेऊन फर्स्ट क्लासचा प्रवास करताय?; टीसी आकारणार दंड

सामान्य तिकीट घेऊन फर्स्ट क्लासचा प्रवास करताय?; टीसी आकारणार दंड

मध्य रेल्वेच्या उपनगरीय गाड्यांच्या प्रथम श्रेणी डब्यांमध्ये “केंद्रित तिकीट तपासणी मोहीम” राबविण्यात येणार आहे. अनेकदा प्रथम श्रेणी डब्यात सामान्य तिकीट घेऊन अथवा तिकीट ना काढता प्रवास करणाऱ्यांमुळे गर्दी होते. त्यातून अनेकदा वाद निर्माण होतात. हेच लक्षात घेता प्रथम श्रेणी तिकीट अथवा पास घेणाऱ्या प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि सुकर करण्याच्या दृष्टीने मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने एक ठोस आणि निर्णायक पाऊल उचलले आहे. मध्य रेल्वे उपनगरीय गाड्यांच्या प्रथम श्रेणी डब्यांमध्ये “केंद्रित तिकीट तपासणी ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121