खारफुटीच्या जागेवर लग्नसोहळा!

अतिक्रमणाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

    24-May-2022
Total Views | 62

bmc
 
 
मुंबई (शेफाली ढवण) : वडाळ्यातील खारफुटीच्या जागेवर लग्नाचे मंडप घालण्यात येत असल्याचा प्रकार समोर आला आहे. वडाळ्यातील प्रभाग क्र. 181 मध्ये असणार्‍या खारफुटीच्या जागेवर लग्नाच्या मंडपांसोबतच प्रभागातील कचरादेखील तेथेच टाकण्यात येत असल्याचीही माहिती स्थानिकांकडून समोर आली आहे. अनधिकृतपणे कचर्‍याचे डम्पिंग करण्यात येत असल्यामुळे तेथे गर्दुल्यांनीदेखील आपला अड्डा बनवण्यास सुरुवात केली असल्याचे स्थानिकांनी सांगितले.
 
 
प्रभागामधील नाल्यातील व इतर कचरा हा या खारफुटीच्या जागेवर आणून टाकण्यात येत असल्यामुळे येथे कचर्‍याचा ढीग तयार झाला आहे. तसेच, याचाच फायदा हा गर्दुल्ले घेत असल्याचे स्थानिकांनी सांगितले. गर्दुल्यांमुळे महिलांसाठी एक प्रकारे असुरक्षित असे वातावरण निर्माण होत असून, यावर प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही.
 
 
खारफुटीच्या जागेवर अतिक्रमण केल्यास गुन्हा दाखल करण्याची तरतूद आहे. मात्र, असे असतानाही स्थानिक प्रशासन याकडे कोणत्याही प्रकारचे लक्ष देत नाही आहेत. वडाळ्यातील ही जागा लग्नासाठी सहज उपलब्ध करून देण्यात येत आहे आणि विशेष म्हणजे या लग्नांसाठी पालिकेचे फिरते शौचालय वापरण्यात येत आहे. तसेच, या लग्नांसाठी तयार करण्यात येणारे भोजनदेखील तेथील कचर्‍याने वेढलेल्या परिसरातच करण्यात येत आहे. खारफुटीच्या जागेवर करण्यात आलेल्या या अतिक्रमणावर प्रशासनाकडून लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी, अशी येथील स्थानिकांची मागणी आहे.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121