मथुरेतील ईदगाह मशिदीवरही जुलैत सुनावणी!

    18-May-2022
Total Views |
 
 
 
 
 
idgah
 
 
 
 
 
 
मथुरा : ज्ञानवापीनंतर मथुरेतील वादग्रस्त शाही ईदगाह मशीद ‘सील’ करण्याची मागणी केली जात आहे. त्यासाठी हिंदू पक्षकारांनी याचिका दाखल केली आहे. पक्षकारांच्या म्हणण्यानुसार, ईदगाह मशीद ‘सील’ केली नाही, तर तेथील गृहगर्भ व पुरातन मंदिराचे अवशेष नष्ट केले जाऊ शकतात. हिंदू अवशेष मिटवले गेले आणि ‘कॅरेक्टर ऑफ प्रॉपर्टी’त बदल झाले तर वादाचा मुद्दा संपुष्टात येईल. मशिदीमध्ये कुणाच्याही जाण्या-येण्यावर बंदी घालावी व मशिदीत कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात यावा. शाही ईदगाहच्या मूळ गृहगर्भातील हिंदूंच्या धार्मिक खुणा म्हणजे ‘स्वस्तिक’, ‘कमळ’, ‘ओम’ या नष्ट करू नयेत, अशी मागणी त्यांनी केली आहे.
 
 
 
 
 
याबाबतचा निर्णय न्यायालय दि. १ जुलैला देणार असून पक्षकारांनी याबाबत तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली आहे. याचिकाकर्ता मनीष यादव यांचे वकील देवकीनंदन शर्मा म्हणाले की, “शाही ईदगाहच्या आत जे शिलालेख आहेत, ते दुसर्‍या पक्षकारांकडून नष्ट केले जाऊ शकतात. या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षकारांच्या देखरेखीत त्याठिकाणची छायाचित्रे घेतली जावीत. तर शाही ईदगाह मशिदीचे वकील तन्वीर अहमद यांनी सांगितले की, पक्षकार मागील दोन वर्षांपासून प्रार्थना पत्र देत आहेत. त्यांना काय म्हणायचे आहे हे स्पष्ट नाही.
 
 
 
 
 
मथुरेतील दोन्ही धर्मस्थळ वेगळे असून त्याठिकाणी छायाचित्रे घेण्याची काही आवश्यकता नसल्याचे ते म्हणाले. यासंदर्भात उपलब्ध माहितीनुसार शाही ईदगाह मशिदीशी संबंधित दहा वाद उच्च न्यायालयात प्रलंबित असल्याचे समजते.
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
श्री पद्मनाभस्वामी मंदिरात २७० वर्षांनंतर पार पडला महाकुंभाभिषेक

श्री पद्मनाभस्वामी मंदिरात २७० वर्षांनंतर पार पडला महाकुंभाभिषेक

केरळमधील श्री पद्मनाभस्वामी मंदिरात 'महाकुंभाभिषेक' हा धार्मिक विधी आयोजित केला जातोय. जवळजवळ २७० वर्षांनंतर हा धार्मिक विधी मंदिरात संपन्न झाला. या विधीसोबतच मंदिरात विश्वक्षेनाची मूर्ती देखील पुनर्प्रस्थापित करण्यात आली. त्यासोबतच तिरुवांबडी श्री कृष्णस्वामी मंदिरात 'अष्टबंधकलशम' नावाचा एक महत्त्वाचा पूजाविधीही केला जाणार असल्याची माहिती आहे. महाकुंभभिषेक हा एक विशेष धार्मिक विधी आहे जो तीर्थस्थळ किंवा मंदिराचे पावित्र्य आणि आध्यात्मिक ऊर्जा पुन्हा जागृत करण्यासाठी केला जातो. ही प्रक्रिया आगम शास्त्रांवर ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121