‘सिल्वर ओक’ हल्ल्याप्रकरणी सदावर्तेंना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

    13-Apr-2022
Total Views | 98
 
 
sadavarte
 
 
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ‘सिल्वर ओक’ या निवासस्थान हल्लाप्रकरणी ॲड. गुणरत्न सदावर्ते यांना गिरगाव महानगर दंडाधिकारी न्यायालयाने १३ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. मात्र त्याची मुदत आज संपत असल्यामुळे पोलिसांनी सदावर्तेंना पुन्हा न्यायालयात हजर केले. यावेळी न्यायालयाने सदावर्तेंना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
 
मुंबई पोलिसांच्या वतीने प्रदीप घरत यांनी युक्तिवाद न्यायालयात आंदोलनासंदर्भात अनेक खुलासे केले असून सदावर्तेंनी विविध एसटी डेपोमधून पैसे गोळा केले, घेतलेल्या पैशाच्या पावत्या नाहीत. या व्यवहारांचा आकडा दोन कोटींपर्यंत पोहोचल्याचे पोलीस तपासात समोर आल्याचेही घरत यांनी कोर्टाला सांगितले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने सदावर्तेंना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
 
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या हल्ल्यासाठी चिथावणी दिल्याप्रकरणी ॲड. गुणरत्न सदावर्ते यांना शुक्रवारी (ता. ८) पोलिसांनी अटक केली होती. त्याचबरोबर शेकडो एसटी कर्मचाऱ्यांना देखील ताब्यात घेतले होते. पोलिसांनी विविध कलमांतर्गत सदावर्ते आणि कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला असून गुरुवारी उच्च न्यायालयाने एसटी आंदोलनाबाबत अंतिम निकाल जाहीर केल्यानंतर झालेल्या सभेत सदावर्ते यांनी पवार यांच्या घरात शिरण्याचा इशारा दिला होता आणि म्हणूनच या प्रेरित होऊन काही कर्मचाऱ्यांनी ‘सिल्व्हर ओक’ येथे जाऊन आंदोलन केल्याचा गुन्हा पोलिसांनी सदावर्तेवर दाखल केला आहे.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121