नवी दिल्ली: कोरोना महासाथीच्या धक्क्याने कोलमडलेल्या अर्थव्यवस्थेला उभारी मिळत असल्याचे आश्वासक चित्र तयार होते आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने सादर केलेल्या माहितीनुसार एकट्या जानेवारी २०२२ या महिन्यात कर्मचारी भविष्य निर्वाह निधीमध्ये १५.३४ लाख नव्या खात्यांची नोंद झाली आहे. डिसेंबर २०२१ मध्ये नोंद झालेल्या खात्यांमध्ये २० टक्क्यांची वाढ झाली आहे. डिसेंबर २०२१ मध्ये १२.६ लाख नव्या खात्यांची नोंद झाली होती. या आकडेवारीचे वैशिष्ट्य म्हणजे या खात्यांमध्ये ३.२० लाख एवढी खाती महिलांची आहेत.
१८- २५ वयोगटातील ६.९० लाख नवीन खाती दाखल झाली आहेत. महाराष्ट्र, हरियाणा, कर्नाटक, गुजरात, या राज्यांमधून नोंद झालेल्या खात्यांची संख्या आधी आहे. कोरोना काळाचा फटका बसल्यानंतर अर्थव्यवस्थेचा वेग मंदावला होता. केंद्र सरकारने हाती घेतलेल्या विविध उपाययोजनांचे फलित आता दिसू लागले आहे हेच यावरून स्पष्ट होते आहे.