मुंबई : मुंबई महापालिकेतील स्थायी समितीचे अध्यक्ष आणि शिवसेनेचे नेते यशवंत जाधव आणि पत्नी आमदार यामिनी जाधव यांची सध्या आयकर विभागाकडून चौकशी होत आहे. या चौकशीत बुधवारी यशवंत जाधव यांचा १२ शेल कंपन्यांशी संबंध असल्याचे उघड झाले आहे. तसेच या कंपन्यांच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचेही सांगण्यात येत आहे.
आयकर विभागाने काही दिवसांपूर्वी ५ कंत्राटदारांसह एकूण ३३ ठिकाणी छापेमारी केली. यात १० बँक खात्यांवर निर्बंधही घालण्यात आले. तसेच २ कोटींची रक्कम, काही महत्त्वाची कागदपत्रे, डिजिटल दस्ताऐवज आयकर विभागाकडून जप्त करण्यात आले आहेत. त्यामुळे आता यशवंत जाधव आणि यामिनी जाधव यांच्या अडचणीत आता वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.