नवी दिल्ली: प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला 'द काश्मीर फाईल्स' हा चित्रपट केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनीही बघितला. यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी या चित्रपटास विरोध करणाऱ्या आणि हे एक षडयंत्र आहे असे म्हणणाऱ्या सर्व राजकीय नेत्यांवर विशेषतः पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार टीका केली. "ममता बॅनर्जी यांचे वागणे हे तेव्हाच्या काश्मिरी राजकारण्यांसारखेच आहे" अशा शब्दांत त्यांनी ममता यांच्यावर टीकास्त्र सोडले. बंगाल निवडणुकांच्या वेळी तृणमूलच्या कार्यकर्त्यांकडून जसे भाजप कार्यकर्त्यांवर अत्याचार करण्यात आले तसेच अत्याचार १९९० साली काश्मीर मध्ये हिंदूंवर करण्यात आले होते असेही ते म्हणाले.
दरम्यान हा चित्रपट आला नसता तर लोकांसमोर कधीही सत्य येऊ शकले नसते असेही ते म्हणाले. काश्मिरी पंडितांवर काय वेळ आली होती हा या चित्रपटामुळेच लोकांसमोर आले. हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा यासाठी हा चित्रपट गावा- गावांमध्ये दाखवला जावा अशी मागणीही त्यांनी केली.