मुंबई : मुंबईचे नवनियुक्त आयुक्त संजय पांडे यांची सीबीआयद्वारे ६ तास चौकशी करण्यात आली आहे.माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी संबंधित प्रकरणाची उच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना तक्रारदाराला प्रभावित करण्याच्या कथित भूमिकेसाठी मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांची काल सीबीआयने ६ तास चौकशी केली असे एनआयने ट्विट केले आहे.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर अँटिलीया प्रकरणात १०० करोडची खंडणी वसूल करण्याच्या संदर्भात आरोप केले होते. त्यांनतर त्यांच्या घर,कार्यालयात वेळोवेळी छापेमारी केली. त्यांनतर मनी लौंड्रीन्ग प्रकरणात ईडीने अनिल देशमुखांना अटक केली.
अनिल देशमुख अजूनही अटकेत आहेत.अनिल देशमुखांची न्यायालयात चौकशी सुरु असताना त्यांच्या विरोधातील तक्रारदाराला धमकावण्याच्या प्रकरणावरून काल जवळजवळ ६ तास संजय पांडे यांची सीबीआय द्वारे चौकशी करण्यात आली असे सांगण्यात आले.