प्रभाते मनीं राम चिंतीत जावा...

    03-Feb-2022
Total Views | 124
 
वैदिक
 
 मनाच्या श्लोकांचा साकल्याने अभ्यास करताना लक्षात येते की, तिसर्‍या श्लोकांत सांगितलेला ’प्रभाते मनीं राम चिंतीत जावा’ हा विचार समर्थांना महत्त्वाचा वाटल्याने त्यांनी तो विचार श्लोक क्र. ६७ ते ७६ या दहा श्लोेकांत पुन्हा नव्याने मांडला आहे. अर्थात, त्या ठिकाणी हा विचार वेगळ्या संदर्भात येतो. या दहा श्लोकांतून राम कसे आहेत, याचे वर्णन समर्थ देत आहेत. श्रीराम हे पूर्णप्रतापी, पराक्रमी असे आहेत. सेवकांवर कुठलेही संकट आले, तरी ते त्यांचे त्या संकटांपासून रक्षण करतात. तथापि भावी काळात येणार्‍या संकटांना घाबरून आपण रामाचेे स्मरण केले पाहिजे, असा मात्र याचा अर्थ नाही. रामाचे स्मरण विचारपूर्वक करून त्यापासून विवेक शिकायचा आहे.
 
सदाचरणाचे अनेक गुणविशेष रामाच्या ठिकाणी वास करीत असल्याने प्रभातकाळी रामाच्यागुणांचे मनन, चिंतन करून दिवसाची सुरुवात करावी, असे स्वामींनी मनाच्या श्लोकांच्या तिसर्‍या श्लोकात सांगितले आहे. श्रीरामांचे अलौकिक गुणविशेष सुप्रभाती मनात आले, तर स्वच्छ, चोख, चारित्र्यपूर्ण आचरण करण्याची प्रेरणा माणसाला मिळते. रात्री झोप घेतली की, शरीराला व मनाला विश्रांती मिळते, असे वरवर पाहताना दिसून येते, पण ते अर्धसत्य आहे. शरीर निद्रिस्त झाले, तरी शरीरांतर्गत हृदयाची हालचाल श्वसनसंस्था, पचनसंस्था, रुधिराभिसरण इत्यादी अनेक क्रिया चालू असतात. त्या बंद होत नाहीत किंवा काही काळ थांबून पुन्हा चालू होतात, असेही नाही. रात्री झोपलेल्या अवस्थेत खाल्लेल्या अन्नाचे पचन होऊन त्यातील पोषक द्रव्ये रक्तात शोषली जातात आणि उरलेला टाकाऊ भाग सकाळी विसर्जित केला जातो. त्याने आपले आरोग्य चांगले राहतेे, उत्साह निर्माण होतो. जी गोष्ट शरीराची ती मनाचीही आहे. झोपेतसुद्धा आपले मन स्वस्थ बसत नाही. ते कार्यरत असते. त्याचे विचार करणे, कल्पनाविलास हे उद्योग चालू असतात. त्यामुळे आपल्याला स्वप्ने पडतात किंवा दिवसभर विचार करूनही जी गोष्ट आठवत नव्हती, ती अचानकपणे सकाळी झोपेतून उठल्यावर आठवते. स्वप्नांच्या बाबतीत बोलायचे तर काही स्वप्ने आठवतात. काही आठवत नाहीत. स्वप्नातील दृश्यात वावरताना ती खरी वाटतात. कारण, मन त्या दृश्यांशी तद्रूप झालेले असते. सकाळी झोपेतून जागे झाल्यावर सदाचरणाचा आदर्श जो राम त्याचे स्मरण-चिंतन दिवसासाठी प्रेरणादायी ठरते. कारण, दिवसभरात अनेक प्रसंगांना, परिस्थितीला तोंड द्यावे लागते. दिवसभरात आपण अनेक प्रकारच्या लोकांच्या संपर्कात येतो. काही घटना मनाविरुद्ध घडतात. काही प्रसंगी हटवादी, मूर्ख, अहंकारी लोक आपल्या संपर्कात येतात. आपला काही दोष नसताना मनस्ताप सहन करावालागतो. अशावेळी आपण प्रतिकार करतो. परंतु, त्यातून वादविवाद, भांडणे होऊन मन पुन्हा अस्वस्थ होते. बरे, आपण अशा प्रसंगी प्रतिकार करायचा नाही, असे ठरवले तरी त्या अप्रिय प्रसंगांची नोंद मनात होतेच. त्यातून मनात द्वेष, मत्सर, क्रोध, वैर हे विकार उद्भवण्याची शक्यता असते. ते विकार मनाला प्रतिक्रियात्मक कृती सूचना देत राहतात. सकाळी झोपेतून उठल्यावर शरीरांतर्गत निरुपयोगी द्रव्ये बाहेर टाकण्याची सोय निसर्गानेे केली आहे, तशी सोय हे विकार बाहेर टाकण्यासाठी आहे का, असा प्रश्न पडतो. या प्रश्नाचे उत्तर समर्थांनी ‘प्रभाते मनीं राम चिंतीत जावा’ असे दिलेले आहे. रामाच्या गुणविशेषाने चिंतन, मनन केल्याने विवेक जागृत होतो. विवेकाने योग्य काय आणि अयोग्य काय, हे समजते. अयोग्य ते टाकून योग्य निवडता येते. विवेकाने विकारांना मनाच्या बाहेर काढता येते. जर आपण विकारांना आवर घालू शकलो, तर मन ताजे, आनंदी राहते. अशा मनाला नवीन कल्पना सुचतात. त्याची आकलनशक्ती, धारणाशक्ती वाढते.
 
मनाच्या श्लोकांचा साकल्याने अभ्यास करताना लक्षात येते की, तिसर्‍या श्लोकांत सांगितलेला ’प्रभाते मनीं राम चिंतीत जावा’ हा विचार समर्थांना महत्त्वाचा वाटल्याने त्यांनी तो विचार श्लोक क्र. ६७ ते ७६ या दहा श्लोेकांत पुन्हा नव्याने मांडला आहे. अर्थात, त्या ठिकाणी हा विचार वेगळ्या संदर्भात येतो. या दहा श्लोकांतून राम कसे आहेत, याचे वर्णन समर्थ देत आहेत. श्रीराम हे पूर्णप्रतापी, पराक्रमी असे आहेत. सेवकांवर कुठलेही संकट आले, तरी ते त्यांचे त्या संकटांपासून रक्षण करतात. तथापि भावी काळात येणार्‍या संकटांना घाबरून आपण रामाचेे स्मरण केले पाहिजे, असा मात्र याचा अर्थ नाही. रामाचे स्मरण विचारपूर्वक करून त्यापासून विवेक शिकायचा आहे. श्रीराम हे सर्व प्रकारची भीती नाहीसे करणारे तर आहेच, पण ते सेवकांना संकटातून बाहेर पडण्यासाठी धैर्य देणारे आहेत. शक्ती, मुक्ती देणारे आहे. समर्थांच्या काळातील महाराष्ट्रातील समाज हा उत्तरेकडील औरंगजेब, दक्षिणेकडील आदिलशहा या हिंदूद्वेष्ट्या राज्यकर्त्यांच्या पेचात सापडला होता. या राज्यकर्त्यांच्या सरदारांकडून सैनिकांकडून सतत हिंदू समाजाचा छळ केला जात होता. अशावेळी श्रीरामांचे भक्तांना दिलेले हे आश्वासन सांगून समर्थांनी तत्कालीन समाजात मानसिक धैर्य उत्पन केले व त्यांना आश्वासित केले. या दहा श्लोकांचे सविस्तर विवेचन पुढे योग्यवेळी केले जाईल. त्या काळी शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची घोषणा करून गड-किल्ले सर करण्यास सुरुवात केली. ते मुघल सत्तेला आव्हान होते. ती एकप्रकारे हिंदवी स्वराज्यांची पहाट होती, प्रभात होती, असे म्हणायला हरकत नाही. अशा या हिंदवी स्वराज्याच्या प्रभातकाळी रामाने स्मरण करणे आवश्यक होते. ‘प्रभाते’ म्हणजे या हिंदवी स्वराज्याच्या प्रभातकाळी ‘राम चिंतीत जावा’ असे समर्थांच्या मनात होते की काय, असे वाटते. हिंदवी स्वराज्याचे स्वप्न राराज्याच्या दिशेने वाटचाल करणारे ठरावे, असे समर्थांच्या व शिवरायांच्या मनात होते. या दहा श्लोकांतून समर्थांनी रामनामाचे, नामस्मरणाचे महत्त्व सांगितले आहे. ते पारमार्थिकांच्या दृष्टीने महत्त्वाचे असले तरी ‘नामस्मरण का?’ यासाठी समर्थांनी अनेक युक्तिवाद त्यात केलेले आहेत. समर्थांच्या निवेदन शैलीचे वैशिष्ट्य म्हणजे समर्थनेहमी सामान्य माणसांच्या मनातील शंकांचा विचार करतात व निवेदनातून त्या शंकांची समर्पक उत्तरे देतात. समर्थांची ही निवेदन शैली मनाच्या श्लोकांप्रमाणे दासबोध ग्रंथातही पाहायला मिळते. नामस्मरणाचा हा विचार आधुनिक काळात गोंदवलेकर महाराजांनी पुढे नेऊन सामान्य माणसांपर्यंत पोहोचवला, गोंदवलेकर महाराज एके ठिकाणी म्हणतात की, त्यांनी रामनामाचे स्मरण करण्याशिवायदुसरे साधन केले नाही. महाराज पुढे म्हणतात की, “नामस्मरणाने मला भगवंत भेटला, तसा तो तुम्हालाही भेटेल. नामस्मरणावर विश्वास ठेवा.” सदाचाराने वागून चारित्र्यसंपन्न जीवन जगण्यात माणसाच्या जीवनाचे सार्थक आहे. त्यासाठी ‘प्रभाते मनीं राम चिंतीत जावा’ हा उपदेश निश्चितपणे महत्त्वाचा आहे.
 
मनाला रामनामाची सवय लावताना सुरुवातीस कष्ट पडतात. कारण, मन हे वायुरूप असल्याने, चंचल असते. एकाच ठिकाणी फार वेळ राहण्याची मनाला सवय नसते. मनाचे आणखी एक वैशिष्ट्य असे की, एखाद्या गोष्टीचे महत्त्व पटवून त्यात मनाला गोडी लावावी. व्यवहारात सतत रामनामाच्या सान्निध्यात राहण्याची मनाला सवय लावावी. असं म्हणतात की, समर्थांच्या सांगण्यावरुन शिवरायांनी त्यांच्या सैन्याला अशी शिस्त लावली होती की, त्यांनी एकमेकांना भेटताना, अभिवादन करताना ‘राम राम’ म्हणावे. अजूनही खेड्यापाड्यावरही वृद्ध माणसे एकमेकांना भेटल्यावर ‘राम राम’ म्हणतात. आज आपल्या शिक्षणपद्धतीत आणि शहरी संस्कृतीत कदाचित हे बसणार नाही. तेव्हा निदान, ‘राम राम’ आज आपल्या शिक्षणपद्धतीत आणि शहरी संस्कृतीत कदाचित हे बसणार नाही. तेव्हा निदान ’प्रभाते मनींराम चिंतीत जावा’ हे लक्षात ठेवले तरी पुरे! (क्रमश:) - सुरेश जाखडी
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121