"सीमावादाबाबत गृहमंत्री नक्की मार्ग काढतील !"

- सुप्रिया सुळेंनी केला विश्वास व्यक्त

    09-Dec-2022
Total Views | 64

supriya sule
 
 
 
 
नवी दिल्ली : महाविकास आघाडीच्या खासदारांनी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीत महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद, राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, छत्रपती शिवाजी महाराज अवमान याबाबत तक्रार केल्याचं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं. या भेटीनंतर त्या दिल्लीत माध्यमांशी बोलत होत्या. गृहमंत्री अमित शाह नक्की मार्ग काढतील. असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला.
 
खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह अमोल कोल्हे, विनायक राऊत, राजन विचारे, अरविंद सावंत आदींनी शहांची भेट घेतली. भेटीनंतर मीडियाशी बोलताना सुळे म्हणाल्या, "अमित शाह यांनी भेटीसाठी वेळ दिला याबद्दल त्यांचे आभार मानते. आम्ही ज्या गोष्टी त्यांच्यासमोर मांडल्या आहेत, त्या अतिशय संवेदनशीलपणे आणि राजकारण बाजूला ठेवून त्यांनी त्यामधून मार्ग काढावा, अशी विनंती त्यांना केल्याचं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं. तसंच गुजरात सरकारचा शपथविधी झाल्यानंतर काहीतरी मार्ग काढतील, असा शब्द त्यांनी दिला आहे. त्यामुळे यात केंद्राचा हस्तक्षेप होईल, असा मला विश्वास आहे." अशी माहिती सुप्रिया सुळे यांनी दिली.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
दारू महागणार, राज्याला मिळणार १४ हजार कोटी , मद्य धोरणात बदल;

दारू महागणार, राज्याला मिळणार १४ हजार कोटी , मद्य धोरणात बदल; 'महाराष्ट्र मेड लिकर' बाजारात आणणार

महाराष्ट्राच्या तिजोरीत थेट १४ हजार कोटी रुपयांची भर घालण्यासाठी महायुती सरकारने मद्य धोरणात महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. मंगळवार, दि. १० जून रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत भारतीय बनावटीच्या विदेशी मद्यावरील उत्पादन शुल्क ३ पटीवरून ४.५ पट वाढवण्याचा, तर देशी मद्याचा दर १८० रुपयांवरून २०५ रुपये प्रति प्रुफ लिटर करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासोबतच, राज्याच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी 'महाराष्ट्र मेड लिकर' या धान्याधारित मद्याच्या नव्या प्रकारालाही मंजुरी देण्यात आली...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121