अर्धवस्त्राच्या भागव्या रंगाला आता मुस्लिम संघटनांचाही विरोध !
19-Dec-2022
Total Views | 77
107
मुंबई : पठाण चित्रपट अनेक कारणांमुळे सतत वादाच्या भोवऱ्यात सापडत आहे. हिंदू संघटनांनी भगव्या रंगाचा अपमान केला या कारणामुळे चित्रपटाच्या गाण्याबाबत निषेध व्यक्त केला. तर अर्धवस्त्र परिधान करून नृत्य करणारी अभिनेत्री पाहून हा पठाण समाजाचा अपमान आहे असे मुस्लिम संघटनांचे म्हणणे होते. त्यानंतर आता भगव्या रंगाचा वापर अर्धवस्त्रासाठी करण्याला मुस्लिम संघटनांचाही विरोध असल्याचे निदर्शनास येत आहे. आरटीआय आक्टिविस्ट डॅनिश खान यांनी या रंगावर आक्षेप घेतला आहे.
दानिश खान यांनी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे (NHRC) तक्रार दाखल केली आहे. ते म्हणतात की, "लोक ज्याला भगवा रंग म्हणत आहेत तो खरं तर चिश्ती रंग आहे आणि मुस्लिम समाजात त्याला खूप महत्त्व आहे." दानिशने चित्रपटातून हे गाणे काढून टाकण्याची मागणी केली आहे. ह्या रंगाचा वापर हिंदू व मुस्लिम दोन्ही समाजाच्या भावना दुखावणारा असल्याने अर्धवस्त्रासाठी हा रंग टाळावा असेही डॅनिश पुढे म्हणाले.
या संदर्भात अनेक राज्यांमध्ये आंदोलने सुरू झाली आहेत. शाहरुख खान-दीपिका पदुकोणचे पठाण. मध्य प्रदेश, राजस्थान, बिहार, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, गुजरात आणि महाराष्ट्रात आंदोलने होत आहेत. बिहारमधील मुझफ्फरपूरमध्ये धार्मिक भावना दुखावल्याचा आणि अश्लीलता पसरवल्याप्रकरणी शाहरुख खान आणि दीपिका पदुकोणसह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
छत्तीसगडमधील शिवसैनिकांनी चित्रपटातून 'बेशरम' हे गाणे काढून टाकण्याची मागणी केली आहे. तसे न केल्यास हा चित्रपट छत्तीसगडमध्ये प्रदर्शित होणार नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. यूपीच्या मथुरेत हिंदू महासभेचा या चित्रपटाला विरोध आहे. त्याविरोधात कोर्टात जाणार असल्याचे ती म्हणते. याशिवाय भाजपच्या नरोत्तम मिश्रा, राम कदम, साध्वी प्राची या बड्या नेत्यांनीही याविरोधात वक्तव्ये केली आहेत.
दरम्यान, यशराज फिल्म्सने अलीकडे सोशल मीडियावर पोस्ट केले आहे की, "बेशरम रंग हे गाणं 100 दशलक्षाहून अधिक वेळा पाहिले गेले आहे. आणि ही फक्त सुरुवात आहे. यशराज फिल्म्सला 50 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल, 25 जानेवारीला तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात पठाण पाहण्याचा आनंद घ्या." शाहरुख-दीपिका असलेल्या या गाण्याला शिल्पा रावने तिचा आवाज दिला आहे. याशिवाय विशाल-शेखरने हे गाणे संगीतबद्ध केले आहे. हे गाणे 12 डिसेंबरला रिलीज झाले आहे.