मुंबई : नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजे एनटीएने JEE, NEET इत्यादी परीक्षांसाठी शैक्षणिक कॅलेंडर जाहीर केले असून यासंदर्भात NTA ने त्यांच्या वेबसाईटवर माहिती दिली आहे. एनटीएने राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा, कॉमन युनिव्हर्सिटी प्रवेश परीक्षा तसेच संयुक्त प्रवेश परीक्षेचे शैक्षणिक कॅलेंडरसोबतच JEE मुख्य परीक्षेसाठी ऑनलाइन नोंदणीच्या तारखादेखील जाहीर करण्यात आल्या आहेत. यानुसार विद्यार्थी १९ डिसेंबर २०२२ ते १२ जानेवारी २०२३ या कालावधीत नोंदणी करू शकतात.
परीक्षांकरिता महत्वाच्या तारखा..
JEE २०२३ सत्र १ - २४, २५, २७, २८, २९, ३०, ३१ जानेवारी २०२३
JEE २०२३ सत्र २- ६, ७, ८, १०, ११, १२ एप्रिल २०२३
NEET UG २०२३ - ७ मे २०२३
CUET २०२३ - २१ ते ३१ मे २०२३
एनटीए परीक्षा कॅलेंडर २०२३ परीक्षेच्या तारखा तपासण्यासाठी काय करावे?
शैक्षणिक कॅलेंडर तपासण्यासाठी, सर्वप्रथम एनटीएच्या अधिकृत वेबसाइट nta.ac.in वर जाऊन वेबसाइटच्या होमपेजवरील ताज्या बातम्या विभागात जावे. ताज्या बातम्यांच्या विभागावरील शैक्षणिक कॅलेंडरच्या लिंकवर क्लिक करावे. या लिंकवर क्लिक केल्यावर महत्त्वाच्या परीक्षांचे कॅलेंडर आपल्याला स्क्रीनवर दिसेल. हे कॅलेंडर तपासून भविष्यासाठी याची हार्डकॉपी देखील स्वतः सोबत ठेवा.