पुणे : केंद्राने दिवाळीनंतर पुणे जिल्ह्याला दिवाळीनंतर गोड बातमी दिली असून, शहराला लागून असलेल्या जिल्ह्यातील रांजणगाव ‘एमआयडीसी’मध्ये ‘इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चिरिंग क्लस्टर’ साकारणार आहे. ‘राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स धोरणा’अंतर्गत येथे तब्बल 217.11 एकरमध्ये त्यास केंद्र सरकारने मान्यता दिली. यामुळे जिल्ह्यातील रोजगारात वाढ होऊन तब्बल पाच हजार जणांना रोजगार मिळणार आहे.
या प्रकल्पाच्या माध्यमातून जवळपास दोन हजार कोटींची गुंतवणूक करण्यात येणार आहे. हा प्रकल्प महाराष्ट्रात प्रामुख्याने पुण्यात येण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न सुरू होते. तसेच, त्यावर राज्य सरकारनेही पाठपुरावा केला होता. याबाबत दि. 19 जुलै रोजी बैठक झाली होती. माहिती तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रानिक्स विभागाचे राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी याबाबत दिल्लीत घोषणा केली. या ‘क्लस्टर’सााठी 492.85 कोटी खर्च करण्यात येणार असून, हा प्रकल्प 32 महिन्यांत पूर्ण होणाार आहे. तसेच, या प्रकल्पाच्या माध्यमातून उद्योजकांना प्रोत्साहन मिळणार असून, ‘इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स, कन्झ्युमर इलेक्ट्रानिक्स’, ‘सेालार पीव्ही मॅन्युफॅक्चिरिंग’, ‘ई मोबिलिटी’ उत्पादन असे उद्योग येणार आहेत.
या ‘क्लस्टर’मुळे ‘एमआयडीसी’तील रोजगाराला मोठ्या प्रमाणात चालना मिळणार आहे. जिल्ह्यासाठी या प्रकल्पाची गुंतवणूक एक चांगली मुहूर्तमेढ ठरणार आहे. पाच हजार रोजगार तसेच, त्या अनुषंगाने स्थानिक बाजारपेठ व त्या सोबत असणार्या इतर सुविधांही या माध्यमातून सुधारण्यास वाव मिळेल.
‘या’ सुविधा कंपनीला मिळणार
या ‘क्लस्टर’मुळे एक महत्त्वपूर्ण पाऊल पडले असून, त्याचा फायदा एकूणच राज्यातील ‘इंडस्ट्री’ला होणार आहे. याचबरोबर ‘मल्टिमॉडेल कनेक्टिव्हिटी इन्फ्रास्ट्रक्चर’, सर्वसमावेशक किंमतीत तयार असलेली औद्योगिक जमीन, 20 ‘एमडब्ल्यू इलेक्ट्रिक सब स्टेशन’सह 24 तास वीजपुरवठा, प्लॉट साईजनुसार पाणी आणि विजेची तरतूद, प्रशासकीय आणि प्रमुख्य व्यवसाय केंद्र आदी सुविधा कंपन्यांना मिळणार आहेत.
राज्याच्या विकासासाठी पुढाकार
‘ई-एमसी योजना 2.0’ अंतर्गत पुण्याच्या रांजणगाव येथे ‘क्लस्टर’ उभारण्यात येणार आहे. ‘स्टार्टअप’ला प्रोत्साहन देणारा हा प्रकल्प राज्यात राबविण्यात येणार असून, राज्याच्या विकासासाठी पुढाकार घेऊन हा प्रकल्प राज्यात राहावा, यासाठी सरकारने पुढाकार घेतला. यामुळे मोठी रोजगार निर्मिती होऊ शकणार आहे
-चंद्रकांतदादा पाटील, पालकमंत्री, पुणे जिल्हा