मुंबई : मुंबई महापालिकेचे अनेक घोटाळे आपल्या कानापर्यंत येतंच असतात. असाच एक घोटाळा मुंबई महापालिकेने मालाड मधील आप्पापाडा येथील महाराणी सईबाई नगर मधील नागरिकांसोबत झाल्याचे येथील स्थानिकांनी 'दै. मुंबई तरुण भारत"सोबत संवाद साधताना म्हटले आहे. तसेच ही घोटाळ्यांची मालिका मागील अनेक कालपासून येथे सुरु असल्याचेही येथील स्थानिकांनी स्पष्ट केले आहे.
मागील तीन वर्षांपासून परिसरात जवळजवळ २५ ते ३० नगरसेवकाच्या माध्यमातून करण्यात आल्याचे कागदावर दिसते. मात्र प्रत्यक्षात केवळ ४ त ५ कामेच येथे झाली असून इतर कामांच्या निविदा काढून त्याचे पैसे लाटण्याचे काम येथे झाले आहे. करोडो रुपयांचा भ्रष्टाचार हा महाराणी सईबाई नगरमध्ये झालेला आहे.
येथील जय भवानी वेलफेअर सोसायटी आहे. ज्यांच्या कामासाठी १४ ते १५ लाखांच्या निविदा काढण्यात आल्या होत्या. पण प्रत्यक्षात तेथील कोणतेच काम झालेले नाही. येथील श्रीनिकेतन चाळीचे ५ लाखांचे बिल काढण्यात आले. परंतु येथे मागील आठ वर्षांपासून कोणतेच काम करण्यात आलेले नाही. अशाप्रकारे कोणताच तपशील न घेता केवळ निविदा काढायच्या आणि केवळ पैसे काढायचे. मात्र प्रत्यक्षात कोणतेच काम करायचं नाही. हेच मागील बऱ्याच काळापासून सुरु आहे, असे येथील स्थानिक व मनसेचे पदाधिकारी मिलिंद दळवी यांनी म्हटले आहे.
- शेफाली ढवण