लक्ष्मीपूजनासाठी पुणे सज्ज

दिवाळीचा उत्साह शिगेला

    24-Oct-2022
Total Views | 45

pune 
 
 
पुणे : निर्बंधमुक्त उत्सव साजरे होत असताना आता हिंदू संस्कृतीमधील सर्वात मोठा सण असलेला दिवाळीचा उत्साह शिगेला पोहोचला असून पुणेकर उद्या सोमवार, दि.24 ऑक्टोबर रोजी होणार्‍या लक्ष्मीपूजनासाठी सज्ज झाले आहेत. बाजारपेठांत उत्साह असून छोटे आणि मोठे व्यावसायिक ग्राहकांच्या सेवेसाठी तत्पर असल्याचे आशादायक चित्र दिसून आले. महिलावर्गाने यावेळी बाजारात खरेदीसाठी प्रचंड गर्दी केली आहे. तरुणाईचा उत्साहदेखील वेगवेगळ्या वस्तू खरेदींसाठी दिसत होता. आनंदाची उधळण आणि चैतन्यमय वातावरणात साजरा करावयाच्या या सणासाठी रांगोळी, तोरण, आकाशदिवे, गृहसजावटीच्या वस्तू यासह सौंदर्यप्रसाधने आणि शोभिवंत नित्योपयोगी वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारात नागरिकांची गर्दी दिसत होती.
 
 
आकर्षक डिझाईनच्या कपड्यांना तसेच आजच्या काळात गरजेच्या झालेल्या मोबाईल, संगणक, लॅपटॉपसोबत अन्य इलेक्ट्रॉनिक वस्तू, वाहने आणि सोन्या-चांदीच्या दागिन्यांसाठी ग्राहकांनी भर दिला असल्याचे निदर्शनास आले. शहराच्या मध्यवर्ती भागासह सिंहगड रस्ता, कोथरूड, मार्केट यार्ड आदी भागांमध्ये खरेदीसाठी सातत्याने नागरिकांची गर्दी होत आहे. यंदा प्रदूषण कमी करणार्‍या फटाक्यांना ग्राहकांनी पसंती दिली आहे. धूर कमी करणारी फुलबाजी, ‘फॅन्सी’ फटाके, भुईनळे, भुईचक्र याला मागणी आहे. पर्यावरणपूरक फटाके बाजारात दाखल झाले आहेत.
 
 
दोन वर्षांनंतर दिवाळी जोरदार साजरी होणार असल्याने शहरात फटाक्यांच्या स्टॉलची संख्याही यंदा वाढली आहे. सिंहगड रस्ता, कोथरूड, शनिवार पेठेतील नदीपात्रालगतचा रस्ता, गोळीबार मैदान या परिसरात फटाक्यांचे अनेक स्टॉल्स लागले आहेत. दोन वर्षांपूर्वी बाजारात दाखल झालेल्या या फटाक्यांच्या प्रकारांचे उत्पादन यंदा 80 ते 90 टक्क्यांनी वाढले असून, नागरिकांकडूनही या फटाक्यांची मागणी केली जात आहे. सुट्ट्या लवंगींची विक्रीही चांगली होत असल्याचे दुकानदारांकडून सांगण्यात आले.
 
आज असे करा लक्ष्मीपूजन...
यंदा सोमवार, दि. 24 ऑक्टोबर रोजी लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त सोमवारी दुपारी 3 वाजल्यापासून सुरू होणार असून रात्रीपर्यंत असणार आहे. यावर्षी नरक चतुर्दशीदेखील सोमवारीच असल्याने या दिवशी पहाटे अभ्यंगस्नान करणे महत्त्वाचे मानले जाते. लक्ष्मी-कुबेर पूजनही याच दिवशी आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घर, दुकान स्वच्छ व सुशोभित करून सूर्यास्तानंतर लक्ष्मी व कुबेर यांचे पूजन करून ऐश्वर्य, संपत्ती, समृद्धीसाठी प्रार्थना करायची असते. या पूजेत समृद्धीचे प्रतीक म्हणून साळीच्या लाह्या आवश्यक असतात, असे पंचांगकर्ते सांगतात. सोमवारी दुपारी 3 ते रात्री 12 पर्यंत लक्ष्मीपूजन करता येईल.

अग्रलेख
जरुर वाचा
हिंदू समाजाने जागृत होणे अत्यावश्यक: सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

हिंदू समाजाने जागृत होणे अत्यावश्यक: सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्षे पूर्ण होतील. संघाचा जन्म, जन्मापासून करावा लागलेला संघर्ष, विस्तार व आज समाजातील सर्वच क्षेत्रांवर संघाचा पडलेला लक्षणीय प्रभाव, या सार्‍या प्रक्रियांबाबत समाजात, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरही कमालीचे कुतूहल आहे. यांसारख्या विविध विषयांवर ‘ऑर्गनायझर’चे संपादक प्रफुल्ल केतकर, ‘पांचजन्य’चे संपादक हितेश शंकर, सा. ‘विवेक’च्या संपादक अश्विनी मयेकर आणि मल्याळम दैनिक ‘जन्मभूमी’चे सहसंपादक एम. बालकृष्णन यांनी सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्याशी साधलेला हा विशेष संवाद.....

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121