‘ड्रेनेज’ सफाईचे काम यंत्रांद्वारे करावे

महापालिका, पोलिसांकडे मागणी; ‘विवेक विचार मंच’ने मांडले मुद्दे

    24-Oct-2022
Total Views | 43

drainage cleaning
 
 
पुणे : वाघोली येथील सोलासीया सोसायटीच्या मलनिस्सारण प्रकल्पाच्या ‘ड्रेनेज चेंबर’मध्ये सफाई काम करताना तीन जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. चेंबरमध्ये प्रवेश करताना जीविताचे रक्षण व्हावे, म्हणून तिघांना कोणतेही साधन साहित्य पुरविले गेले नसल्याचे दिसून येते. या घटनेची चौकशी करावी, तसेच ‘ड्रेनेज’ सफाईचे काम यंत्रांद्वारे करावे, अशी मागणी ’विवेक विचार मंच’च्या वतीने करण्यात आली आहे.
 
 
या घटनेनंतर नेमकी वस्तुस्थिती समजून घेण्यासाठी मंचचे कार्यकर्ते भरत आमदापुरे व अ‍ॅड. रिषभ परदेशी यांनी पीडितांच्या नातेवाईकांची व सोलासीया सोसायटीच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष व इतर सदस्यांची नुकतीच भेट घेतली. पुणे शहर पोलिसांनी तसेच, महापालिकेने घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
 
 
दरम्यान, या एका घटनेबाबत विचार करणे पुरेसे होणार नाही. देशभरात सफाईचे काम माणसांना त्यात प्रत्यक्ष उतरवून जीवाला धोका होईल, अशा पद्धतीने केले जाते. या प्रश्नावर कायम स्वरूपी तोडगा काढण्याकरिता विचार मंथन करण्यासाठी ‘विवेक विचार मंचा’चे अध्यक्ष आणि निर्मल वारी अभियानाचे प्रणेते पुण्याचे माजी खासदार प्रदीप रावत यांनी दि. 20 सप्टेंबर रोजी तज्ज्ञ व्यक्तींची बैठक बोलविली होती. त्यात ’दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स (डिक्की)’चे अध्यक्ष मिलिंद कांबळे, उद्योजक अनिरुद्ध देशपांडे, मलनिस्सारण क्षेत्रातील अनुभवी उद्योजक राजीव खेर, युवा उद्योजिका मैत्रेयी कांबळे या सहभागी झाल्या होत्या.
 
प्रशासनासमोर ठेवलेले मुद्दे
या घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना तातडीने आर्थिक मदत मिळावी, ढहश झीेहळलळींळेप जष एाश्रिेूाशपीं री चरर्पीरश्र डलर्रींशपसशीी रपव ढहशळी ठशहरलळश्रळींरींळेप रलीं 2013 या कायद्याची कठोर अंमलबजावणी करावी, ड्रेनेज सफाईचे काम यंत्रांद्वारे करावे, ‘डिक्की’च्या माध्यमातून दिल्ली व हैदराबाद मध्ये असा प्रयोग यशस्वी झालेला आहे. अशा प्रकारे यंत्रांद्वारे ‘ड्रेनेज’ सफाईचे काम करण्याची पद्धत अंमलात आणावी, देशात ’अर्बन सॅनिटेशन पॉलिसी’ची गरज आहे. ज्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था, राज्य सरकार व केंद्र सरकार यांच्या विविध योजना व कायद्यांमध्ये सुसूत्रता येण्यास मदत होईल व सफाई कामगारांचा नाहक जीव जाणे टाळले जाईल.
अग्रलेख
जरुर वाचा
गिरीश महाजन यांच्यावर आरोप करता, हे योग्य नाही - चंद्रशेखर बावनकुळे यांचा एकनाथ खडसे यांना सल्ला

गिरीश महाजन यांच्यावर आरोप करता, हे योग्य नाही - चंद्रशेखर बावनकुळे यांचा एकनाथ खडसे यांना सल्ला

राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याबाबत एकनाथ खडसेंनी केलेले वक्तव्य हे त्यांचं टार्गेटिंग असून त्यांच्या प्रतिमेला गालबोट लावण्याचा प्रयत्न आहे. फक्त संबंध असल्याचा अर्थ हा गुन्हा केला असे होत नाही. माझेही अनेकांसोबत संबंध आहेत, पण त्याचा अर्थ मी काही गैर केले असे होत नाही. माझा खडसेंना सल्ला आहे,तुम्ही सतत गिरीश महाजन यांच्यावर आरोप करता, हे योग्य नसल्याचे मत राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे नागपुरात प्रसार माध्यमांशी बोलत ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121