प्रभासच्या वाढदिवसानिमित्त आदिपुरुष चित्रपटाचे नवीन पोस्टर केले शेयर
23-Oct-2022
Total Views | 60
2
मुंबई : आदिपुरुष चित्रपटाबाबत सिनेवर्तुळात बरीच चर्चा सुरु आहे. सैफ आली खानाचे रावण अवतारातले पोस्टर लोकांच्या पचनी पडले नव्हते. परंतु आज प्रभासच्या ४२ व्या वाढदिवसनिमित्त प्रभासचे श्री रामाच्या अवतारातले पोस्टर निर्मात्यांनी प्रकाशित केले. रावणाच्या लूक नंतर ओम राऊत यांच्यावर प्रचंड टीका झाली होती. प्रभासचे पोस्टर मात्र लोकांच्या पसंतीस उतरत असल्याचे समाज माध्यमांवरील प्रतिक्रियांवरून समजते आहे.
प्रभासच्या वाढदिवसानिमित्त हे पोस्टर निर्मात्यांनी आजच्या दिवशी प्रकाशित करून प्रभासला वाढदिवसाचं बक्षीस दिलं आहे. आदिपुरुषचं हे पोस्टर लोकांना आवडलं असलं तरी जुन्या पोस्टर वरून झालेला लोकांचा संताप कमी झालेला नाही. एवढेच काय तर धर्मविषयक भावना दुखावल्या गेल्याने कित्येकांनी निर्मात्यांवर आरोप करून थेट पोलीस स्थानकात तक्रारी नोंदवल्या आहेत. सैफ अली खानच्या लूकमध्ये डोळ्यात दाट सुरमा घातलेला व अतिशय विनोदी पात्रासारखा दिसणारा रावण पाहून त्याविषयी तीव्र निषेध व्यक्त केलेला आहे.
प्रभासच्या पोस्टर मध्ये डाव्या हातात धनुष्य तर उजव्या हातात बाण दिसतो आहे. त्याचप्रमाणे पाठीवर बाणांचा भाता लटकावलेला आहे. या पोस्टरला मात्र लोकांची वाहवा समाजमाध्यमांवरून मिळत असल्याचे समजते.