बंगाल हिंसाचार – सीबीआय व एसआयटीचा अहवाल न्यायालयात सादर

    04-Jan-2022
Total Views | 96
wb


मुख्य न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर सुनावणी
 
 
 
नवी दिल्ली, विशेष प्रतिनिधी : विधानसभा निवडणुकीनंतर बंगालमध्ये उसळलेल्या हिंसाचाराच्या तपासासंदर्भात सीबीआय आणि विशेष तपास पथकाने (एसआयटी) कोलकाता उच्च न्यायालयात आणखी एक स्थिती अहवाल सादर केला आहे.
 
 
कोलकाता उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती प्रकाश श्रीवास्तव यांच्या खंडपीठासमोर सोमवारी निवडणुकीनंतर झालेल्या हिंसाचाराचा तपास करणाऱ्या सीबीआय व एसआयटीने आपापले अहवाल सादर केले. सीबीआयने या प्रकरणात ५० हून अधिक एफआयआर नोंदवले आहेत आणि अनेक प्रकरणांमध्ये कनिष्ठ न्यायालयात आरोपपत्रही दाखल केले आहे.
 
 
यापूर्वी 4 ऑक्टोबर रोजी सीबीआय आणि एसआयटीने कोलकाता उच्च न्यायालयात सीलबंद लखोट्यात अहवाल सादर केला होता. तब्बल महिनाभरानंतर सोमवारी या प्रकरणावर पुन्हा सुनावणी झाली. त्येवळी उच्च न्यायालयाने पुन्हा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार हा अहवाल सादर करण्यात आला आहे. मतदानानंतरच्या हिंसाचाराच्या 689 प्रकरणांपैकी 10 प्रकरणे वगळता बाकीची नोंद झाली आहे. उर्वरित दहा प्रकरणांचा अहवाल महिनाभरात सादर करून तपासातील प्रगतीची माहिती दिली जाणार आहे. अनेक प्रकरणांमध्ये एसआयटीने आरोपपत्रेही दिली आहेत. उर्वरित प्रकरणांचा तपास अहवाल पुढील सुनावणीच्या दिवशी एसआयटीकडे सोपवण्याचे निर्देश दिले आहेत. सीबीआयने ५० एफआयआर नोंदवले आहेत. ज्यांच्याकडे अद्याप घर नाही, त्यांची यादी महाधिवक्ता यांना देण्यात यावी, जेणेकरून संबंधित अधिकाऱ्याला या प्रकरणात लक्ष घालता येईल, असे निर्देश देण्यात आले आहेत.
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121