PHOTO : मोदींचे हे रूप तुम्ही कधी पहिले आहे का?

    28-Jan-2022
Total Views | 158

ncc

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी दिल्लीतील करिअप्पा मैदानावर सुरू असलेल्या एनसीसी रॅलीत सहभागी झाले होते. यादरम्यान त्यांची स्टाइल चर्चेत राहिली. मोदी पंजाबी पगडी आणि काळ्या चष्म्यात दिसले आणि त्यांना एनसीसी कॅडेट्सनी गार्ड ऑफ ऑनर दिला.
 
मोदींनी कॅडेट्सना सांगितले- मला अभिमान आहे की मी देखील एकेकाळी एनसीसीचा सक्रिय सदस्य होतो. एनसीसी मजबूत करण्यासाठी आमचे सरकार अनेक पावले उचलत आहे. या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने गर्ल कॅडेट्सही सहभागी होत असल्याचे पाहायला मिळत आहे. हाच बदल आज भारत पाहत आहे.रॅलीदरम्यान, पंतप्रधानांनी एनसीसीच्या १००० कॅडेट्सच्या मार्चपास्टची सलामी घेतली. १९५३ पासून दरवर्षी काढण्यात येणारी ही रॅली प्रजासत्ताक दिनानंतर आयोजित केली जाते.



modi
 
 दिल्लीतील करिअप्पा मैदानावर एनसीसीच्या रॅलीमध्ये पंतप्रधान मोदी पंजाबी पगडीमध्ये दिसले.
 

modi

एनसीसी कॅडेट्सनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गार्ड ऑफ ऑनर सादर केला.


modi
१९५३ पासून दिल्लीत प्रजासत्ताक दिनानंतर दरवर्षी एनसीसी रॅली काढली जाते.

modi 

एनसीसी रॅलीमध्ये १००० कॅडेट्स सहभागी झाले होते. त्यामध्ये गर्ल कॅडेट्सचीही लक्षणीय संख्या होती.

modi 

रॅलीदरम्यान आझादी अमृत महोत्सव ध्वज आकाशात फडकवताना एनसीसी कॅडेट्स.

modi 
 
या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वोत्कृष्ट कॅडेटचा ट्रॉफी देऊन गौरव केला.


modi 

कार्यक्रमात एनसीसी कॅडेट्सनी पुनीत सागर अभियानाची चित्ररथ दाखवली. या मोहिमेत ३.९ लाखांहून अधिक कॅडेट्सनी भारतातील किनारी क्षेत्र स्वच्छ करण्यात भाग घेतला.
 
 

modi 
 
 एनसीसी कॅडेट्सनी या काळात अनेक सांस्कृतिक उपक्रमही केले, ज्यामध्ये कॅडेट्सनी अनेक पराक्रमही दाखवले.


 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121