निद्रा भाग २

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |
 
  
sleeping_1  H x
 
 
झोप येणे, शांत झोप लागणे हा मनुष्यस्वभाव आहे. निद्रेला अधारणीय वेगांमध्ये समाविष्ट केलेले आहे. वेग म्हणजे Urges. शरीराच्या व मनाच्या काही इच्छावेग असतात. यातील काही इच्छा, संवेदनांचे धारण करू नये, त्यांना थांबवू नये, असे आयुर्वेदशास्त्रात सांगितले आहे. ज्यांची संवेदना थांबवू नये (जसे - भूक, तहान, रडू येणे, मल त्यागाची भावना, मूत्रत्यागाची संवेदना, जांभई, शिंक, अधोवात, झोप इ.) अशा वेगांना ‘अधारणीय वेग’ म्हटले आहेत. अशा संवेदना जर व्यक्तीने वारंवार रोखल्या, अडविल्या, तर त्या व्यक्तीला विविध रोगांना सामोरे जायला लागू शकते. म्हणजे, अधारणीय वेगांचे धारण केल्याने रोग उद्भवू शकतात. निद्रा ही संवेदनादेखील अधारणीय वेगांमधीलच एक संवेदना आहे.
 
 
मागील लेखातून निद्रेबद्दल थोडे जाणून घेतले. त्रयोपस्तंभांपैकी निद्रा एक उपस्तंभ आहे. उत्तम आरोग्यासाठी मनुष्याला त्याच्या देहाच्या मूळ स्वभावामुळे रोज स्वभाविकपणे झोप येते. झोपेचा कालावधी ऋतुमानानुसार (थंडीत जास्त व उन्हाळ्यात कमी), वयानुसार (बाल्यावस्थेत जास्त, वार्धक्यात कमी), स्वास्थ्यानुसार (रुग्ण व्यक्तीस कमी-अधिक व स्वस्थ व्यक्तीस नेहमीप्रमाणे) व मानसिक स्वास्थ्यानुसार कमी-अधिक बदलतो. तसेच प्रकृतीप्रमाणेही झोपेचा कालावधी भिन्नभिन्न असतो. कफ प्रकृतीच्या व्यक्तींना झोप जरा जास्त लागते. या व्यक्ती खूप काळ व खूप गाढ झोपतात. पित्त प्रकृतीच्या व्यक्तींना झोपेत खूप स्वप्न पडत असतात. त्यांची झोप कफ प्रकृतीच्या सापेक्ष कमी असते. वात प्रकृतीच्या व्यक्तींची झोप तुटक असते. थोड्याही आवाजाने जाग येते व जाग असल्यास लगेच झोप लागत नाही. तिन्ही प्रकृतींपैकी वातज प्रकृतीच्या व्यक्तींची झोप कमी असते.
 
 
आयुर्वेदशास्त्रात भिन्न भिन्न आचार्यांनी निद्रेचे वेगवेगळे प्रकार सांगितले आहेत. चरकाचार्यांनी निद्रेचे सात प्रकार सांगितले आहेत.
१) तमोभव - जेव्हा तमोगुणाची शरीरात वृद्धी होते. तेव्हा तमामुळे झोप येऊ लागते.
२) श्लेष्मसमुद्भव - शरीरात जेव्हा कफाचे प्रमाण अधिक होते, वाढते तेव्हा या वाढलेल्या कफामुळे झोप येऊ लागते. जेवणानंतरची ग्लानी, झापड येणे हे श्लेष्मसमुद्भव निद्रेचे उत्तम उदाहरण आहे.
३) मनश्रमसंभव - अतिमानसिक ताण-तणावामुळे मन थकते, आपापली ज्ञानेंद्रिये व कर्मेंद्रिये कार्य नीट करण्यात असमर्थ ठरतात व झोप येऊ लागते. अतिअभ्यास, वाचन एकाग्रतेने कार्य केल्यास जी झोप येते, ती मनश्रमसंभव या प्रकारात मोडते.
४) शरीरश्रमसंभव - ज्याप्रमाणे मन थकल्याने झोप येते तशीच शारीरिक कष्ट झाल्यावर, शरीर थकल्यावरही चटकन झोप येते.
५) आगंतुकी - शरीरात काही बिघाड नसताना, काही विशिष्ट त्रास नसताना, अवास्तव झोप येणे, सतत झापड येणे, या प्रकारच्या झोपेला आगंतुकी म्हटले आहे. यात काही एक्स्टर्नल फॅक्टर्स कारणीभूत असू शकतात. या प्रकारच्या झोपेला मृत्युसूचक म्हटले आहे.
६) व्याध्यानुवर्तिनी - जी झोप आजारी माणसाला व आजारपणानंतर नेहमीपेक्षा अधिक येते, ती झोप या प्रकारात मोडते. विविध ताप, जुनाट आजार असतेवेळी शरीराला व मानसिक कष्ट झेपत नाहीत. थोडीही हालचाल झाल्यावर वाचन, बडबड इ. क्रिया झाल्यावर झापड येते, झोप लागते, या प्रकारची झोप व्याध्यानुवर्तिनी प्रकारची झोप होय.
७) रात्री स्वभावप्रभाव - रात्रीची प्रकृती ही तमोगुणाची असते. रात्रीच्या स्वभावामुळे (Nature of the Night) प्राकृततः मनुष्य प्राण्याला रात्री स्वाभाविकपणे झोप येते व शांत गाढ झोप लागते.
 
 
आचार्य सुश्रुत यांनी वरील सात प्रकारांपेक्षा वेगळे तीन प्रकार निद्रेचे सांगितले आहेत.
तामसिक, स्वाभाविका व वैकारिकी.
१) तामसिक - यालाच चिरनिद्रा असेही नाव दिले आहे. जेव्हा संज्ञातह स्रोतस कफाधिक्याने भरते व तमोगुणाचा प्रादुर्भाव वाढतो. तेव्हा तामसिक/तामसी निद्रा उत्त्पन्न होते.
२) स्वाभाविक - यालाच ‘वैष्णवी’ किंवा ‘पापणी’ असे पर्यायी शब्द आहेत. सजीव वस्तूंचा स्वभाव आहे झोपणे. त्यामुळे प्रत्येक सजीव वस्तू प्राकृततः व स्वाभाविकपणे रोज झोपते. हा त्यांचा गुणधर्मच आहे.
३) वैकारिकी - झोप जेव्हा शरीरात/मनात बिघाड असतो, वेळ येते त्या झोपेला वैकारिकी निद्रा म्हटले जाते. शरीर व किंवा मनात काही विकृती आल्यास, झोप प्रथम लागत नाही, पण नंतर जर लागली, तर ती नेहमीपेक्षा कमी/अधिक/तुटक/गाढ/भिन्न स्वभावाची असू शकते. या प्रकारच्या निद्रेला वैकारिकी निद्रा म्हणतात.
 
 
वरील प्रकारांपेक्षा अजून काही वेगळे प्रकार आयुर्वेदशास्त्रात सांगितले आहेत. ते खालीलप्रमाणे-
१) अमयज - रोगाच्या (शारीरिक व मानसिक स्वभावामुळे किंवा त्यांच्या परिणामामुळे जी झोप येते, त्या झोपेला अमयज निद्रा म्हटले आहे.
२) आगंतुक बाह्य कारणांमुळे घटकांमुळे जी स्वाभाविक निद्रा आहे, त्याव्यतिरिक्त जी येते, त्याला आंगतुक निद्रा म्हटले जाते. उदा. पडल्यानंतर दुखापत झाल्यानंतर, अ‍ॅक्सिडेंट झाल्यानंतर, मेंटल ट्रॉमा असतेवेळी, शॉकमध्ये असताना जी झोप येते, तिला आगंतुक निद्रा म्हणतात.
 
 
झोप येणे, शांत झोप लागणे हा मनुष्यस्वभाव आहे. निद्रेला अधारणीय वेगांमध्ये समाविष्ट केलेले आहे. वेग म्हणजे Urges. शरीराच्या व मनाच्या काही इच्छावेग असतात. यातील काही इच्छा, संवेदनांचे धारण करू नये, त्यांना थांबवू नये, असे आयुर्वेदशास्त्रात सांगितले आहे. ज्यांची संवेदना थांबवू नये (जसे - भूक, तहान, रडू येणे, मल त्यागाची भावना, मूत्रत्यागाची संवेदना, जांभई, शिंक, अधोवात, झोप इ.) अशा वेगांना ‘अधारणीय वेग’ म्हटले आहेत. अशा संवेदना जर व्यक्तीने वारंवार रोखल्या, अडविल्या, तर त्या व्यक्तीला विविध रोगांना सामोरे जायला लागू शकते. म्हणजे, अधारणीय वेगांचे धारण केल्याने रोग उद्भवू शकतात. निद्रा ही संवेदनादेखील अधारणीय वेगांमधीलच एक संवेदना आहे.
 
 
निद्रेचे जर धारण केले, म्हणजेच झोप आलेली असताना न झोपणे किंवा रात्रीची स्वाभाविक झोप न घेता दिवसा झोपणे, विपरित वेळेत झोपणे किंवा झोप झालेली असतानाही गरजेपेक्षा अधिक काळ झोपणे, वरील सर्व पद्धतीने निद्रेचे धारण करणे होय. असे केल्याने मनुष्य आजारी पडू शकतो. निद्रेचे धारण केल्यास अंगदुखी, डोकेदुखी, डोके जड होणे, गरगरणे, डोळे जड होणे व आपल्या आसपास काय चालू आहे, हे नीट न कळणे ‘डिसोरिएशन’इ. लक्षणे उत्पन्न होऊ शकतात.
अपुर्‍या झोपेमुळे ताण (शारीरिक व मानसिक) वाढतो. मनोस्थैर्य बिघडते. मन लवकर विचलित होते. रात्री जागरणामुळे (शिफ्ट ड्युटीज्मुळे, अभ्यासामुळे, व्यवसायामुळे इ.) मलबद्धता उद्भवू शकतेे. मूळव्याध, भगंदर इ. त्रास होऊ शकतात. तसेच विभिन्न जीर्ण शारीरिक त्रास जडू शकतात.
 
 
निद्रेतील काही ठळक बदल
निद्राविपर्यय (म्हणजे जागायच्या वेळेत झोपणे आणि झोपायच्या वेळी जागणे. (इम्प्रॉपर स्लीप) यामुळे बरेचसे वातव्याधी उत्पन्न होतात.
प्रजागरण म्हणजे जागरण करणे. रात्रीचा प्रहर झोपेचा आहे. तेव्हा न झोपणे व दिवसाही न झोपणे किंवा कमी झोपणे. यामुळे विविध पित्ताचे त्रास होऊ शकतात.
दिवास्वप्न (दिवसा झोपणे) दिवसा थोड्या वेळेत, वामकुशी घ्यावी, असे शास्त्रात सांगितले आहे, पण त्याऐवजी दिवसा ताणून देणे (दोन-चार तास झोपणे) यालाच दिवास्वप्न असेही म्हणतात. रात्री व्यवस्थित झोपून पुन्हा दिवसा ताणून दिल्याने शरीरात भिन्न भिन्न कफामुळे त्रास/तक्रारी उद्भवतात. याबद्दल अधिक विश्लेषण पुढील भागात.
(क्रमश:)
 
 
@@AUTHORINFO_V1@@