नारायण राणे यांची अटक म्हणजे घटनेची पायमल्ली – जगतप्रकाश नड्डा

    24-Aug-2021
Total Views | 125
rane_1  H x W:



राणे यांच्या अटकेमुळे भाजप घाबरणार नसल्याचे नड्डा यांनी म्हटले आहे
 
 
 
नवी दिल्ली, विशेष प्रतिनिधी : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची अटक म्हणजे घटनात्मक मुल्यांची पायमल्ली आहे. मात्र, अशा कोणत्याही कारवाईस भाजप घाबरणार नसून जनआशीर्वाद यात्रा सुरुच राहणार आहे, असे ट्विट भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांनी केले आहे.
 
 
 
 
 
 
केंद्रीय सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी अटक करण्यात आली. त्याविषयी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांनी ट्विट केले. ते म्हणाले, महाराष्ट्र सरकारने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना केलेली अटक म्हणजे घटनात्मक मूल्यांचे हनन आहे. मात्र, अशा प्रकारच्या कोणत्याही कारवाईस भाजप घाबरणार नाही आणि दबणारही नाही. भाजपला जनआशीर्वाद यात्रांमध्ये मिळणारा मोठा प्रतिसाद पाहून हे लोक घाबरले आहेत. त्यामुळे लोकशाही पद्धतीने लढा देत राहणार असून जनआशीर्वाद यात्राही सुरूच राहणार असल्याचे नड्डा यांनी म्हटले आहे.
 
 
महाराष्ट्र सरकारने लोकशाहीची हत्या केली – डॉ. संबित पात्रा
 
 
कदाचित जे बोलू नये ते वक्तव्य नारायण राणे यांनी केले असेल. मात्र, त्यावरून त्यांच्याविरोधात ३० ते ४० गुन्हे नोंदविणे आणि त्यांना अटक करणे ही लोकशाहीची हत्या आहे. दरमहा १०० कोटी वसुली करणारे अनिल देशमुख आणि हिंदूविरोधी वक्तव्य करणारा सरजिल उस्मानी यांना अटक करण्याची हिंमत ठाकरे सरकार दाखविणार का, असा सवाल भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते डॉ. संबित पात्रा यांनी मंगळवारी पत्रकारपरिषदेत केला.
 
 
ते पुढे म्हणाले, राज्य सरकारमधील तब्बल २७ मंत्र्यांवर विविध गुन्हे आहेत. त्यांना अद्याप अटक झालेली नाही. सत्ताधारी पक्षाचे खासदार संजय राऊत दररोज ज्या प्रकारची वक्तव्ये करीत असतात, ते तर अतिशय लाजिरवाणे असते. मात्र, त्याविरोधात कारवाई करण्याची हिंमत राज्य सरकारमध्ये नसल्याचेही पात्रा यांनी नमूद केले.
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
जागतिकस्तरावर राज्यातील पर्यटन उद्योगाला, पुणे ग्रॅण्ड चॅलेंज टुर स्पर्धेच्या माध्यमातून चालना मिळणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जागतिकस्तरावर राज्यातील पर्यटन उद्योगाला, पुणे ग्रॅण्ड चॅलेंज टुर स्पर्धेच्या माध्यमातून चालना मिळणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्य शासनाच्या सहकार्याने पुणे जिल्हा प्रशासन व सीएफआयच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या पुणे ग्रॅण्ड चॅलेंज टुरच्या माध्यमातून वार्षिक आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सायकलिंग स्पर्धेचे आयोजन अतिशय स्तुत्य उपक्रम असून पुण्याला प्रमुख पर्यटन आणि जागतिक क्रीडा केंद्र म्हणून प्रस्थापित करणे या भव्य स्पर्धेमुळे शक्य होणार आहे. पुणे ग्रॅण्ड चॅलेंज टुर स्पर्धा येत्या तीन चार वर्षांत निश्चितचं जागतिकस्तरावर लोकप्रिय स्पर्धा ठरेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121