रा.स्व.संघ जनकल्याण समितीतर्फे खोपोलीकरांसाठी ‘ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स

    03-Jun-2021
Total Views | 36

RSS_1  H x W: 0
खोपोली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती आणि राष्ट्रीय हितसंवर्धक मंडळ, पेण (शाखा खालापूर) यांच्यावतीने ‘ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स’ खोपोली आणि खालापूर परिसरातील नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत.ब्राह्मण सभा सभागृहात माजी नगरसेवक राजेंद्र फक्के व उद्योजक जयेश अभाणी यांच्या हस्ते नुकतेच ‘ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स’चे लोकार्पण करण्यात आले.
 
 
 
 
याप्रसंगी रा.स्व.संघाचे तालुका कार्यवाह अविनाश मोरे, जनकल्याण समितीचे जिल्हा कार्यवाह नितीन भावे, विश्व हिंदू परिषदेचे जिल्हामंत्री रमेश मोगरे, रोहित कुलकर्णी, संघाचे नगर कार्यवाह दीपक कुवळेकर, सुधाकर भट इ. याप्रसंगी उपस्थित होते.कोरोना रुग्णाची ऑक्सिजनची पातळी कमी होत असताना व ‘ऑक्सिजन बेड’ सहज उपलब्ध होत नसतो, अशा वेळेला ‘ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर’च्या मदतीने रुग्णाला काही काळ दिलासा मिळू शकतो.
 
 
 
तसेच डॉक्टरांच्या सल्ल्याने रुग्ण बरा झाल्यानंतरही आठ-दहा दिवस ‘ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर’ची मदत होऊ शकते. जनकल्याण समितीच्या रुग्णोपयोगी साहित्य केंद्रात याची उपलब्धता होणार आहे. ज्यांना ‘ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर’ची आवश्यकता आहे, अशांनी जनकल्याण समितीचे जिल्हा कार्यवाह नितीन भावे ९८२३१०३९३७ व अविनाश मोरे ७०२०१४१४०४ यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121