देशात दिवसभरात ९४,०५२ नवे रुग्ण

    11-Jun-2021
Total Views | 54

CORONA_1  H x W
 
नवी दिल्ली : भारतात गेल्या २४ तासांत ९४ हजार, ०५२ नव्या रुग्णांची नोंद झाली. देशात सलग तिसर्‍या दिवशी एक लाखांपेक्षा कमी नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. भारतात सक्रिय रूग्णसंख्येत सातत्याने घट होत आहे. देशातील सक्रिय रुग्णसंख्या सध्या ११ लाख, ६७ हजार, ९५२ आहे. सलग दहाव्या दिवशी ती २० लाखांपेक्षा कमी आहे. गेल्या २४ तासांत रुग्णसंख्येत एकूण ६३ हजार, ४६३ ने घट झाली आणि देशाच्या एकूण सक्रिय रुग्णसंख्येच्या ती केवळ चार टक्के इतकी आहे.
 
 
  देशात सलग २८ व्या दिवशी दैनंदिन नव्या रुग्णांपेक्षा बरे होणार्‍यांची संख्या अधिक आहे. गेल्या २४ तासांत १ लाख, ५१ हजार, ३६७ रुग्ण बरे झाले. दैनंदिन नव्या रुग्णांच्या तुलनेत ५७ हजार, ३१५ आणखी रुग्ण गेल्या २४ तासांत बरे झाले. महामारीच्या सुरुवातीपासून ‘कोविड-१९’ संसर्ग झालेल्यांपैकी २ कोटी, ७६ लाख, ५५ हजार, ४९३ जण आधीच बरे झाले आहेत.
 
 
 
 
गेल्या २४ तासांत १ लाख, ५१ हजार, ३६७ रुग्ण बरे झाले. त्यामुळे बरे होणार्‍या रुग्णांचा कल वाढता असून बरे होण्याचा एकूण दर ९४.७७ टक्क्यांवर पोहोचला आहे. देशात चाचण्यांच्या क्षमतेत सातत्याने वाढ कायम असून गेल्या २४ तासांत एकूण २० लाख, ०४ हजार, ६९० चाचण्या करण्यात आल्या. देशात आतापर्यंत एकूण ३७.२१ कोटींपेक्षा अधिक (३७ कोटी, २१ लाख, ९८ हजार, २५३) चाचण्या करण्यात आल्या.
 
 
 
देशभरात एकीकडे चाचण्यांचे प्रमाण वाढत आहे. त्याचवेळी साप्ताहिक ‘पॉझिटिव्हिटी’मध्ये घसरणीचा कल कायम आहे. साप्ताहिक ‘पॉझिटिव्हिटी’ दर सध्या ५.४३ टक्के, तर दैनंदिन ‘पॉझिटिव्हिटी’ दर ४.६९ टक्के आहे. सलग १७ व्या दिवशी तो दहा टक्क्यांपेक्षा कमी आहे. देशव्यापी लसीकरण अभियानाअंतर्गत गेल्या २४ तासांत लसीकरणाने २४ कोटींचा टप्पा पार केला आहे. गेल्या २४ तासांत ३३ लाख, ७९ हजार, २६१ लसींच्या मात्रा देण्यात आल्या.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121