"बीव्हीआर सुब्रह्मण्यम" आता वाणिज्य सचिव

    28-May-2021
Total Views | 92

bvr subramanyam_1 &n
 
 
नवी दिल्ली - जम्मू-काश्मीरचे मुख्य सचिव "बीव्हीआर सुब्रह्मण्यम" हे नवीन वाणिज्य सचिव म्हणून पदभार स्वीकारतील, अशी माहिती सरकारने गुरुवारी दिली. तसेच देशातील प्रमुख गुप्तचर संस्था 'रॉ' आणि 'इंटेलिजेंस ब्युरोच्या' प्रमुखांना एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे.गुरुवारी जारी केलेल्या अधिकृत आदेशानुसार छत्तीसगड 'केडरचे' १९८७ बॅचचे 'आयएएस' अधिकारी सुब्रह्मण्यम 'आयएएस' विशेष कर्तव्य अधिकारी म्हणून आता केंद्रात येणार आहेत.
 
 
३० जून रोजी अनुप वाधवन यांच्या कार्यकाळानंतर बीव्हीआर सुब्रह्मण्यम यांना वाणिज्य विभागातील सचिवपदाच्या नियुक्तीस मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने मान्यता दिली आहे.सुब्रह्मण्यम यांनी जून २०१८ मध्ये जम्मू-काश्मीरच्या मुख्य सचिवपदाची सूत्रे हाती घेतली होती आणि त्यांच्या कार्यकाळात २०१९ मध्ये जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा रद्द झाला होता.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121