पेटते बंगाल (भाग ८); रामनवमी साजरी केली म्हणून ‘अभाविप’ कार्यकर्त्याच्या घरावर हल्ला

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-May-2021   
Total Views |
violence_1  H x




पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूकीत तृणमूल काँग्रेसला बहुमत मिळाले आणि त्यानंतर राज्यात हिंसेचे थैमान सुरू झाले. राज्यात अशी स्थिती असतानाही ममता बॅनर्जी यांना त्याचे काहीही सोयरसुतक नाही. बंगालमधील ‘ममतामयी’ हिंसाचाराची भीषण परिस्थिती दैनिक मुंबई तरुण भारत समोर आणत आहे. आजच्या आठव्या भागात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांवर करण्यात आलेल्या हल्ल्यांविषयी जाणून घेणार आहोत.
 
 
 
 
नवी दिल्ली, पार्थ कपोले : “अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे (अभाविप) कार्यकर्ते तन्मय नॉष्कर यांनी आपल्या घरात रामनवमी साजरी केली आणि घरावर भगवा झेंडा लावला होता. तो राग तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना होता. त्यामुळे निवडणुकीच्या निकालानंतर ४ मे रोजी त्यांच्या घरावर हल्ला करण्यात आणि सुमारे ८ ते १० लाखांचा सामानही लुटून नेला आहे.” 'अभाविप' केंद्रीय समितीचे सदस्य सुमन चंद्र दास सांगत होते.
 
 
 
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आतापर्यंत 'अभाविप' च्या ३६२ कार्यकर्त्यांवर हल्ले करण्यात आले आहेत. अभाविपने निवडणुक प्रचारात चालविलेल्या जनजागरण मोहिमेचा राग मनात ठेवूनच तृणमूल काँग्रेसतर्फे असे हल्ले करण्यात येत आहेत. त्याविषयी जादवपूर विद्यापीठातील पीएच.डी संशोधक आणि 'अभाविप' केंद्रीय समितीचे सदस्य सुमन चंद्र दास यांनी मुंबई तरुण भारतशी बोलताना हल्ल्यांची माहिती दिली.
 
 
 
ते म्हणाले, डायमंड हार्बर येथे तन्मय नॉष्कर हे 'अभाविप' कार्यकर्ते राहतात. परिषदेच्या कार्यात तन्मय हे अतिशय सक्रिय आहेत. त्यांनी आपल्या घरात रामनवमी साजरी केली होती, त्याचप्रमाणे रामनवमीच्या दिवशी आपल्या घरावर भगवा ध्वजही त्यांनी उभारला होता. त्याचवेळी त्यांना तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी धमक्या दिल्या होत्या, मात्र तेव्हा निवडणूक प्रक्रिया सुरू असल्याने केवळ धमक्यांवरच निभावले गेले. मात्र, निवडणुकीचा निकाल जाहिर झाल्यानंतर ४ मे रोजी तृणमूलचे ५० ते ६० कार्यकर्ते तन्मय यांच्या घरावर चालून गेले. या हल्ल्यामध्ये तन्मय यांच्यासह त्यांच्या वडिलांनाही मारहाण करण्यात आली. तेव्हापासून तन्मय हे आपल्या घरी गेलेले नाहीत, त्यांनी अन्य सुरक्षित ठिकाणी आश्रय घेतला आहे. गंभीर बाब म्हणजे, तन्मय यांच्या बहिणीचे लग्न असल्याने घरामध्ये तशी तयारी करण्यात आली होती. मात्र, तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घरामध्ये लूटमार करून दागिन्यांसह सुमारे ८ ते १० लाखांचा ऐवजही लुटून नेला आहे, अशी माहिती सुमन चंद्र दास यांनी दिली.
 
 
 
पोलिसांनी नेहमीप्रमाणेच तन्मय नॉष्कर यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केले आहे. विशेष म्हणजे आता 'अभाविप' कार्यकर्त्यांवर दाखल जुन्या गुन्ह्यांवरून पुन्हा त्रास देण्यास सुरूवात करण्यात आली आहे. अभाविप कार्यकर्त्यांनी पुन्हा तृणमूल काँग्रेस विरोधात काही करू नये, यासाठी हे प्रकार सुरू असल्याचेही सुमन चंद्र दास म्हणाले.
 
 
 

abvp_1  H x W:  
 
 
 
'अभाविप' जनजागरण मोहिमेचा राग
 
 
 
'अभाविप' ने निवडणुक काळात मतदार जनजागृती मोहिम राज्यात सर्वत्र चालविली होती. यामध्ये ममता बॅनर्जी यांच्या दहा वर्षांच्या कार्यकाळातील भ्रष्टाचार, घोटाळे, हिंसाचार या विषयांवर अभाविप कार्यकर्ते जनजागरण करीत होते. या उपक्रमास नागरिकांना मोठा प्रतिसाद मिळत होता. तेव्हापासूनच अभाविप कार्यकर्त्यांवर हल्ला करण्याची योजान तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते आखत होते. त्यामुळे निवडणुकीच्या निकालाच्या दिवशीच कोलकाता येथील अभाविप कार्यालयावर हल्ला करण्यात आल्याचे सुमन चंद्र दास यांनी नमूद केले आहे.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@