पंढरपुरात भाजपचे समाधान आवताडे आघाडीवर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-May-2021
Total Views |

shefali_1  H x




पंढरपूर :
पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकींच्या मतमोजणीला सकाळी ८ वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार भगीरथ भालके यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक घेण्यात आली. राष्ट्रवादीसह भाजपनेही प्रतिष्ठेच्या केलेल्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीचा आज रविवारी (२ मे) निकाल लागणार आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके विजयी होणार की भाजपचे उमेदवार समाधान आवताडे बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. 

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या २१ व्या फेरी अखेर भाजपचे समाधान आवताडे ३४८६ मतांनी आघाडीवर

राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार भारत भालके यांचं निधन झाल्याने पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान झालं. या निवडणुकीत भालके यांचे चिरंजीव भगीरथ भालके यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी देण्यात आली. भालके यांच्या उमेदवारीला शिवसेना आणि काँग्रेसने पाठिंबा दिला आहे. तर भाजपने समाधान आवताडे यांना उमेदवारी दिली आहे. या दोन्ही उमेदवारांच्या प्रचारासाठी दोन्ही पक्षांनी मोठी ताकद लावली होती. या पोटनिवडणुकीसाठी एकूण ३४०८८९ मतदारांपैकी २२५४९८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. एकूण ६६.१५ टक्के मतदान या पोटनिवडणुकीसाठी झालं. पंढरपुरात प्रचंड मतदान झाल्याने या निवडणुकीत कोण विजयी होणार याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.याच निवडनुकी संधार्भात आढावा वाचा.


मतदारसंघाची पार्श्वभूमी काय ?


मंगळवेढा-पंढरपूर मतदारसंघात एकूण २२ गावे आहेत. पंढरपुरातील उरलेली गावं माढा, मोहोळ आणि सांगोला मतदारसंघात जोडलेली आहेत. पंढरपूरचं देवस्थान आणि पंढरपूरमधील राजकीय घडामोडींमुळे हा मतदारसंघ कायम चर्चेत असतो. पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीचं सर्वाधिक वर्चस्व आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने पश्चिम महाराष्ट्रात वर्चस्व निर्माण करण्याची संधी भाजपला मिळाली आहे. त्यामुळे भाजपने या मतदारसंघात चांगलाच जोर दिला आहे.


एक्झिट पोल काय सांगतो?


या निवडणुकीनंतर पुण्याच्या ‘द स्ट्रेलेमा’ या संस्थेने एक्झिट पोल जाहीर केला आहे. त्यानुसार भगीरथ भालके यांना ९५५०८, समाधान आवताडे यांना ९८९४६, अपक्ष उमदेवार सिद्धेश्वर आवताडे यांना ७१२४, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन शिंदे यांना ८६१९, अपक्ष उमेदवार शैला गोडसे यांना ६५९६ आणि इतरांना ८६९३ मते मिळणार आहे. एक्झिट पोलनुसार समाधान आवताडे हे ३४३८ मताधिक्य घेऊन विजयी होणार असल्याचं म्हटलं आहे. म्हणजे दोन टक्के मतांनी आवताडे यांचा विजय होताना दिसत आहे. उपलब्ध संसाधने आणि सहानूभूती या स्पर्धेत संसाधनांनी सहानूभूतीवर मात केल्याचंही या निष्कर्षात नमूद केलं आहे.

भालके तीनदा निवडुन आले .
दिवंगत भारत भालके सलग तिसऱ्यांदा या मतदारसंघातून विजयी झाले होते. मात्र या तिन्ही वेळा ते वेगवेगळ्या पक्षातून सभागृहात पोहोचले होते. २००९मध्ये त्यांनी पंढरपूर विधानसभा मतदारसंघात माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचा पराभव केला आणि ते राजकारणातील जायंट किलर ठरले. २०१९मध्ये त्यांनी माजी आमदार सुधाकर परिचारक यांचा पराभव केला. विशेष म्हणजे २०१९मध्ये त्यांनी काँग्रेसला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. खरंतर त्यावेळी ते काँग्रेस सोडून भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा होत्या. मात्र ऐनवेळी भारत भालकेंनी ‘डब्ल्यू’ टर्न घेत कमळ हाती घेता-घेता अचानक राष्ट्रवादीचं ‘घड्याळ’ हाती बांधलं होतं.


आवताडेंच सहकाराचं जाळं आणि लोकसंपर्क


समाधान आवताडे यांनी गेल्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. त्यात त्यांचा पराभव झाला होता. आवताडे गटाच्या ताब्यात दामाजी शुगर, पंचायत समिती, जिल्हा परिषद सभापती, सहकारी संस्था आणि अनेक ग्रामपंचायती आहेत. त्यांचे ग्रामीण भागात चांगले जाळे आहे. सहकाराचं जाळं आणि लोकसंपर्क याचा त्यांना फायदा होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.


इतर उमेदवार किती मते यावर विजय ठरेल


समाधान आवताडे यांनी गेल्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. त्यात त्यांचा पराभव झाला होता. आवताडे गटाच्या ताब्यात दामाजी शुगर, पंचायत समिती, जिल्हा परिषद सभापती, सहकारी संस्था आणि अनेक ग्रामपंचायती आहेत. त्यांचे ग्रामीण भागात चांगले जाळे आहे. सहकाराचं जाळं आणि लोकसंपर्क याचा त्यांना फायदा होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.या मतदारसंघात केवळ आवताडे आणि भालके यांच्यातच लढत होणार आहे. आवताडे यांचे बंधू सिद्धेश्वर आवताडे यांच्या उमेदवारीमुळे आवताडे यांची तर शिवसेनेच्या पदाधिकारी शैलजा गोडसे या निवडणूक रिंगणात असल्याने भालके यांची डोकेदुखी वाढली आहे. हे दोन्ही उमेदवार किती मते खातात यावर भालके आणि आवताडे यांचं भवितव्य अवलंबून असल्याचंही राजकीय निरीक्षकांचं म्हणणं आहे.

कुणाला किती टक्के मतदान?


एक्झिट पोलनुसार समधान आवताडे यांना पंढरपूर शहरात ४५ टक्के, पंढरपूर ग्रामीणमध्ये ३६ टक्के आणि मंगळवेढ्यात ४६ टक्के असे त्यांना सरासरी ४४ टक्के मतदान होताना दिसत आहे. तर भगीरथ भालके यांना पंढरपूर शहरात ४७ टक्के, पंढरपूर ग्रामीणमध्ये ४३ टक्के आणि मंगळवेढ्यात ४० टक्के असे त्यांना सरासरी ४२ टक्के मतदान होताना दिसत आहे. तर सिद्धेश्वर आवताडे यांना सरासरी ३ टक्के, सचिन शिंदे यांना सरासरी ४ टक्के, शैला गोडसे यांना सरासरी ३ टक्के आणि इतरांना सरासरी ४ टक्के मतदान होताना दिसत आहे.
@@AUTHORINFO_V1@@