नवी दिल्ली : आपत्कालीन वापरासाठी डीआरडीओने कोरोनाविरोधी लढ्यासाठी अँटी कोरोना ड्रॅग २DG ची घोषणा केली. आता हे औषध कोरोना रुग्णांवरील उपचारसाठी वापरता येईल. केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांच्या उपस्थितीत या औषधाची घोषणा करण्यात आली. हे औषध पावडरच्या स्वरूपात उपलब्ध आहे. हे औषध प्रथम दिल्लीतील डीआरडीओ कोविड रुग्णालयात दाखल झालेल्या रूग्णांना दिले जाईल.
जूनमध्ये हे औषध सर्वत्र उपलब्ध होईल : डीआरडीओ
याबाबत माहिती देताना डीआरडीओचे प्रमुख जी. सतीश रेड्डी म्हणाले की, या आठवड्यात या औषधाचे उत्पादन एकूण उत्पादन सुमारे १०,००० इतके होईल. आज एम्स, एएफएमएस आणि डीआरडीओ रुग्णालयात हे वापरण्यात येईल. उर्वरित भाग पुढील टप्प्यात राज्यांना देण्यात येतील. यासाठी मात्र थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे. मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापासून सर्व ठिकाणी २ डीजी औषधे उपलब्ध असतील. ते म्हणाले की, हे औषध कोरोना विषाणूने संक्रमित पेशींवर कार्य करेल. शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढेल आणि रुग्ण लवकर बरा होईल. सकाळी व संध्याकाळी कमीतकमी ५ ते ७ दिवस रुग्णाच्या वजन आणि डॉक्टरांच्या निर्देशानुसार २ डोस घ्यावे लागतात.
डीआरडीओने डॉ. रेड्डीजच्या प्रयोगशाळांच्या मदतीने हे औषध बनविले
डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजच्या संयुक्त विद्यमाने डीआरडीओच्या न्यूक्लियर मेडिसिन आणि अलाईड सायन्सेस (आयएनएमएएस) संस्थेने हे औषध तयार केले आहे. क्लिनिकल संशोधनादरम्यान, 2-डीजी औषधाचे ५.८५ ग्रॅम वजनचे पाकीट तयार केली गेली. यातील एक पाकीट सकाळी आणि संध्याकाळी पाण्यात मिक्स करून रुग्णांना दिले गेले. त्याचा निकाल सकारात्मक आल्याचे दिसून आले. ज्या रुग्णांना औषधे दिली गेली होती त्यांच्यामध्ये जलद रिकव्हरी दिसून आली. त्या आधारावर, ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने या औषधाच्या आपत्कालीन वापरास मान्यता दिली आहे.