आयपीएल २०२१ : राजस्थान रॉयल्सकडून कोरोनाबाधीतांना मदत जाहीर

    29-Apr-2021
Total Views | 56

RR_1  H x W: 0
मुंबई : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढू लागला आहे. अशामध्ये ऑक्सिजनची कमतरता, बेड्सची उपलब्धता याचा प्रश्न उभा राहिला आहे. अशामध्ये अनेक जण पुढे येऊन आपल्यापरीने कोरोनाबाधीतांची मदत करत आहे. अशामध्ये आयपीएलकडून कोणतीही मदत होत नसल्याची टीका होत होती. अशामध्ये आता आयपीएलमधील संघानेही पुढाकार घेत कोरोनाबाधीतांसाठी एक पाऊल पुढे टाकले आहे. राजस्थान रॉयल्सने फाऊंडेशनच्या माध्यमातून ७.५ कोटींची रक्कम निधी म्हणून जमा केली आहे.
 
 
 
 
 
 
राजस्थान रॉयल्सने ७.५ कोटींचा हा निधी कोरोना रिलीफ फंडला देण्याचा निर्णय घेतला आहे. असे जाहीर करताच तो कोरोनासाठी पुढे येणारा पहिला आयपीएल संघ ठरला आहे. सर्व देशभर पसरलेल्या कोरोना महामारीमुळे पीडितांना तातडीने मदत मिळावी म्हणून हा निधी जमा केल्याचे राजस्थान संघाने गुरुवारी सांगितले. त्यांनी ट्विट केले आहे की, "संघ मालकांनी आणि संघ व्यवस्थापनाने खेळाडूंसोबत निधी गोळा केला आहे आणि राजस्थान रॉयल्स फाऊंडेशन (आरआरएफ) आणि ब्रिटीश एशियन ट्रस्ट (बीएटी) च्या कल्याणकारी संस्थांसमवेत संघ कार्यरत आहे."
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121