WhatsApp वापरणाऱ्यांसाठी धोक्याचा इशारा

    19-Apr-2021
Total Views | 131
dv _1  H x W: 0
 



मुंबई (अल्पेश करकरे) : अनेक वेळेला समाज माध्यमातून अनेकांची फसवणूक झालेली आपण पहिली आहे. त्यात आता व्हॉट्सअॅपवर एक मेसेज खूप व्हायरल होत आहे. यात व्हाट्सअप्प आता गुलाबी रंगात बदलण्यात येणार आहे, असं म्हणत एक लिंक फिरत आहे. व्हॉट्सअप गुलाबी होणार म्हटल्यावर अनेकांनी हौशीने या लिंकचा वापर करून पाहिला मात्र, आता अनेकानी त्यांचे व्हॉट्सअप हॅक झाल्याची कबुली दिली आहे. या लिंकवर क्लिक केल्याने फोन हॅक होऊ शकतो, असे सायबर तज्ज्ञांनी म्हटले आहे.
 
 
एका व्हायरल मेसेज मध्ये दावा करण्यात येत आहे की, या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुमचे व्हॉट्सअॅप गुलाबी रंगाचे होईल. तसेच त्यात नवीन फीचर्स सुद्धा जोडले जातील. याला अधिकृत अपडेट सांगितले जात आहे. सायबर तज्ज्ञ प्रशांत माळी यांनी म्हटले की, व्हॉट्सअॅप पिंक संबंधी कोणतीही लिंक आल्यास तुम्ही सावध राहा. एपीके डाउनलोड लिंक सोबत व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये व्हायरस पसरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. पिंकच्या नावावर आलेल्या कोणत्याही लिंकला क्लिक करू नका. लिंकला क्लिक केल्यानंतर फोन हॅक होत असून तुम्हाला तुमचा फोन वापरणे अवघड होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121