मुंबई : भांडूप परिसरातील काही भागांमध्ये १२ तास पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच, अंधेरी आणि धारावीतील काही भागात ५ तास पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. यामुळे नागरिकांना काही अडचणीस सामोरे जावे लागणार आहे. मुंबई पालिकेने या भागांतील नागरिकांना पुरेसा पाणीसाठा करून पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले आहे.
पवईतील अँकर ब्लॉक पवई येथे तानसा (पूर्व) सागरी ब ९०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीवरील जल झडप तसेच पवई उच्च स्तरीय जलाशय -१ इनलेटर दुरुस्तीचे काम २३ मार्च रोजी हाती घेण्यात येणार आहे. हे दुरुस्तीचे काम २३ मार्च रोजी सकाळी १० ते रात्री १० या कालावधीत हाती घेण्यात येणार आहे.