"विनायक राऊत चप्पलचोर आणि थापेबाज"

    09-Feb-2021
Total Views | 95

rane_1  H x W:

निलेश राणेंनी विनायक राऊताना हद्दपार करण्याचे दिले आव्हान

मुंबई : गेले अनेक दिवसांपासून शिवसेना नेते व खासदार विनायक राऊत आणि राणे कुटुंबीय यांचा मध्ये टीका टिपण्णी पाहायला मिळत आहे, खासदार विनायक राऊत यांनी नारायण राणे याना नॉन मेट्रिक म्हणत ,केंद्रात मंत्रिपद देण्याची वेळ आली, तर दुर्दैवच असं म्हणत टीका केली होती . यावर विनायक राऊत यांच्यावर भाजप नेते निलेश राणे यांनी टोचणाऱ्या शब्दात टीका करत राऊत याना प्रत्युत्तर दिले आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्या हट्टामुळे शिवसेना-भाजपची युती तुटली. तसेच अमित शाह हे विश्वासघातकी व्यक्ती आहेत, तर राणेंसारख्या नॉन मॅट्रिक माणसाला केंद्रात मंत्रिपद देण्याची वेळ आली,हे तर दुर्दैवच खासदार नारायण राणे यांनी रमेडिकल कॉलेज संधर्भात एकदा नव्हे, तर तीन वेळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन केला होता. तीन-तीन वेळा फोन केला म्हणून मुख्यमंत्र्यांनी मनाचा मोठेपणा दाखवून राणेंची विचारपूस केली आणि काय काम आहे ते विचारुन घेतलं. नारायण राणे गृहमंत्री अमित शाहांना खुश करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शिव्या द्यायचं काम करतात, राणेंचा तो परीपाट आहे, अशा शब्दात शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी घणाघाती टीका केली होती.
 
 
या टीकेला निलेश राणे यांनी एक व्हिडीओ ट्विट करुन प्रत्युत्तर दिले आहे. या व्हिडीओत निलेश राणे यांनी विनायक राऊत यांचा अक्षरश: शेलक्या शब्दांत उद्धार केला आहे.विनायक राऊत ही खासदारपदाच्या लायकीची व्यक्ती नाही. संसदेत काय बोलायचे हेदेखील त्यांना कळत नाही. केवळ लाट होती म्हणून ते कोकणातून निवडून आले. त्यांच्यात हिंमत असेल तर या क्षणाला खासदाराकीचा राजीनामा देऊन निवडणूक लढवून दाखवावी. मग त्यांना किती मतं पडतात, हे पाहूच. विनायक राऊत यांच्यात तेवढी हिंमतही नाही. पण २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत आम्ही त्यांचा बंदोबस्त करुन राऊतांना कोकणातून हद्दपार करू, अशी गर्जना निलेश राणे यांनी केली.
 
तसेच पुढे निलेश राणे म्हणाले की,राऊत हे नॉन मेट्रिक आहेत ,दोन दोन बायका आणि खासदारकीचा एकही गुण त्यांच्यामध्ये नाहीत कोणत्याही विषयाची त्याला माहिती नाही ,फक्त टीका करण्यासाठी त्यांची ओळख आहे . बाळासाहेब यांच्यानंतर एक थापा हि गेला असेल, पण राऊत हे नवीन थापा आहेत. ते घाण साफ करायला ,चपला उचलायला मातोश्रीवर असतात, त्याचा पलीकडे यांचं काम काही नाही.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121