कोकण प्रदेश मंत्री प्रेरणा पवार यांचा राज्य शासनाला थेट सवाल
मुंबई: महाराष्ट्रामध्ये ‘टाळेबंदी’चे निर्बंध सैल होत असले, तरी राज्यातील महाविद्यालये सुरू करण्यात आली नाहीत. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे ऑनलाईन पद्धतीने वर्ग होत असले, तरी ज्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष महाविद्यालयामध्ये येऊन शिक्षण घ्यावे लागते. (उदा. वैद्यकीय, अभियांत्रिकी) अशा विद्यार्थ्यांचे सरकारच्या निष्क्रियतेमुळे नुकसान होत असल्याचे दिसत आहे.
अशा विविध समस्यांवर मार्ग काढण्यासाठी महाविद्यालये लवकरात लवकर सुरू करण्यात यावी, अशी मागणी अभाविपच्या कार्यकर्त्यांनी मुंबई, ठाणे, कल्याण, पनवेल, रायगड, रत्नागिरी अशा विविध ठिकाणी मंगळवार, दि.२ फेब्रुवारी रोजी आंदोलने करून विविध महाविद्यालयांमध्ये अभाविपकडून निवेदन देण्यात आले.
‘युजीसी’ने ५ नोव्हेंबर रोजी विद्यार्थ्यांच्या आरोग्याची चिंता आणि मानसिक परिस्थिती लक्षात घेऊन, विद्यापीठे पुन्हा सुरू करण्यासाठी मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या. परंतु, राज्य शासनाकडून अद्याप शाळा, महाविद्यालये सुरू करण्यात का आल्या नाहीत? असा प्रश्न कोकण प्रदेश मंत्री प्रेरणा पवार यांनी नुकताच राज्य शासनाला केला आहे.