कोरोनात दहावीचा वर्ग भरविल्याने
कडोंमपाने केली कारवाई
कल्याण : कोरोनाच्या प्रादुर्भाव वाढू नये याकरिता शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. पण शहराच्या पश्चिम भागातील जोशी बागेतील एम.जे.बी. या शाळेत दहावीचा वर्ग भरत असल्याची माहिती कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या प्रभाग अधिका:यांना मिळताच त्यांनी शाळेच्या विरोधात कारवाई केली आहे.
गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू होताच शाळा बंद करण्यात आल्या होत्या. कल्याण-डोंबिवलीत कोरोना रुग्णांचा आकडा हा दिवसेंदिवस वाढताच दिसून येत होता. कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या कल्याण-डोंबिवलीत नव्या वर्षात शाळा ऑनलाईन झाल्या. मधल्या काळात कोरोना रुग्णांची संख्या घटली होती. आता पुन्हा कोरोनाने डोके वर काढयला सुरूवात केली आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने सामाजिक अंतर राखणो, मास्क लावणो यासाठी महापालिका प्रशासन आग्रही असल्याचे दिसून येत आहे. राज्यात काही ठिकाणी लॉकडाऊन ही घेण्यात येत आहे. मात्र ही सगळी उपाययोजना आखली जात असताना कल्याणमधील एम. जे. बी. शाळेत दहावीचा वर्ग भरला होता. दहावीच्या वर्गात मुलींसुध्दा उपस्थित होत्या. महापालिकेचे प्रभाग अधिकारी भागाजी भांगरे यांना दहावीचा वर्ग भरल्याची माहिती मिळताच ते शाळेत पोहोचले. त्यांनी त्याठिकाणी धाव घेताच शाळेतील मुली बाहेर पडल्या. यातील काही मुलींच्या तोंडावर मास्क नव्हता. शाळेच्या विरोधात महापालिकेने कारवाई केली आहे.
शाळेकडे याबाबत विचारणा केली असता शाळा प्रशासनाकडून सांगण्यात आले की, दहावीची परिक्षा असल्याने मुलींना एका दिवसाकरिता वर्गात बोलविले होते. शाळेकडून असे सांगण्यात आले असले तरी हा वर्ग दररोज भरविला जात असल्याची कुजबूज शाळा परिसरात ऐकावयास मिळाली आहे.
--------------------------------------------------------------