आत्ता बोला! लस नको म्हणून पठ्ठ्यानं दिलं 'हे' कारण!

    24-Dec-2021
Total Views |

Vaccine _1




डोंबिवली
: कल्याण डोंबिवली महापलिकेच्या डोंबिवली पूर्व भागातील नेहरु मैदान परिसरातील कोरोना लसीकरण केंद्रावर एक २९ वर्षीय तरुणाने लस घेण्यासाठी रजिस्ट्रेशन केले होते. मात्र लस न घेताच त्याने पळ काढला. लसीकरणाविषयी काही जणांच्या मनात भितीचे वातावरण कायम असल्याचे दिसून येत आहे.

एक तरुण हा त्याच्या आईसोबत लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी गेला होता. तो लसीकरणाच्या रांगेत उभा होता. मात्र त्याचा नंबर येताच लसीकरण केंद्रावरील कर्मचाऱ्यांनी त्याचे आधारकार्ड घेऊन त्याचे लसीकरणासाठी रजिस्ट्रेशन केले. यानंतर त्याला लस घेण्यासाठी आत सोडले असता. त्याने नर्सला सांगितले की, त्याला लघुशंका आली आहे. नर्सने त्याला आधी लस घ्या, मग जा, असे सांगितले.


रजिस्ट्रेशन करून तरुणाचा लस न घेण्याचा इरादा पाहून त्याला नर्सने धरुन ठेवले. त्या ठीकाणी सुरक्षा रक्षकाला त्याच्या सोबत जाण्यास सांगण्यात आले. त्याने त्याला नकार दिला. लसीकरण केंद्रावरील कर्मचाऱ्यांनी त्याला पकडून ठेवून लस देण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्या हाताला झटका देत तरुणाने त्या ठिकाणाहून पळ काढला. हा त्याचा दुसरा डोस होता. त्याने पळ काढल्याने त्याने पहिला डोस तरी घेतला आहे की नाही, असा प्रश्न या घटनेमुळे उपस्थीत झाला आहे.





यासंदर्भात डॉ.अनुपमा साळवे यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, हा तरुण लस न घेता पळून गेला आहे. त्याचे नाव आमच्याकडे आहे. त्याचे रजिस्ट्रेशन झाले आहे. त्याने लस घेतली नसली तरी, त्याला ट्रेस करून त्याच्या घरी जाऊन महापालिकेचे पथक लस देणार आहे.



यात लसीकरण केंद्राचा काही एक दोष नाही. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेनंतर ओमायक्रॉन व्हेरीयंटाच्या भितीपोटी लसीकरणाचे प्रमाण वाढले आहे. तसेच अनेक ठिकाणी दोन डोस घेतलेल्या नागरीकांनाच प्रवेश दिला जात आहे. यामुळेच या तरुणाने रजिस्ट्रेशन करून लस न घेता पळ काढला आहे. एक तर या तरुणाच्या मनात लसीकरणाविषयी भिती असावी अथवा त्याला केवळ रजिस्ट्रेशन हवे होते. जे सगळीकडे आवश्यक मानले जात आहे.





अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121