अन् पुन्हा माऊलीच्या कुशीत; ७ दिवसात बिबट्याच्या ७ पिल्लांची आईसोबत पुनर्भेट

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Dec-2021   
Total Views |
leopard cubs_1  



मुंबई (अक्षय मांडवकर) -
उसाच्या शेतात बेवारस अवस्थेत सापडलेल्या बिबट्याच्या सात पिल्लांची (leopard cub) त्यांच्या आईसोबत पुनर्भेट करुन देण्यामध्ये जुन्नर वन विभाग आणि ‘वाईल्डलाईफ एसओएस’ टीमला यश मिळाले आहे. महत्त्वाचे म्हणजे, ही सात पिल्ले (leopard cub) केवळ सात दिवसांमध्ये आईच्या कुशीत पुन्हा विसावली आहेत. जुन्नर वन विभाग आणि ‘वाईल्डलाईफ एसओएस’च्या टीमने गेल्या वर्षभरात आईपासून विभक्त झालेल्या २३ पिल्लांची (leopard cub) पुन्हा आईसोबत पुनर्भेट घडवून आणण्याचे काम केले आहे.

पश्चिम महाराष्ट्रात ऊस कापणीचा हंगाम सुरू झाल्यापासून आईपासून विभक्त झालेली बिबट्याची पिल्ले (leopard cub) सापडण्यास सुरुवात झाली आहे. जुन्नर वनपरिक्षेत्रात दरवर्षी या हंगामामध्ये उसाच्या शेतात बिबट्याची पिल्ले बेवारस अवस्थेत सापडतात. अशावेळी वन विभागाकडून या पिल्लांना ताब्यात घेऊन या पिल्लांची (leopard cub) मादी बिबट्यासोबत पुनर्भेट घडवून आणण्यासाठी प्रयत्न केले जातात. यासाठी रात्री पिल्लांना सापडलेल्या ठिकाणी ठेवून त्यांची आई येण्याची वाट पाहिली जाते. अशा पद्धतीने जुन्नर वन विभागाने ‘वाईल्डलाईफ एसओेएस’ टीमच्या मदतीने बेवारस झालेली सात पिल्लांची (leopard cub) अवघ्या सात दिवसांमध्ये पुन्हा आईसोबत पुनर्भेट घडवून दिली आहे. २४ ते २७ नोव्हेंबर या कालावधीत वेगवेगळ्या परिसरातील उसाच्या शेतात सापडलेल्या बिबट्याच्या सात पिल्लांची (leopard cub) आम्ही त्यांच्या आईसोबत पुनर्भेट घडवून आणल्याची माहिती सहाय्यक वनसंरक्षक अमित भिसे यांनी दिली. ही कामगिरी अवघ्या सात दिवसांमध्ये केल्याचे त्यांनी सांगितले.

 
२४ नोव्हेंबर रोजी जुन्नर वनपरिक्षेत्रातील घोडेगावमधील उसाच्या शेतात दोन महिन्यांची २ पिल्ले, २५ नोव्हेंबर रोजी उबंरजमधून दीड महिन्यांची ३ पिल्ले आणि २६ नोव्हेंबर रोजी ओतूरमधून अडीच महिन्यांची २ पिल्ले सापडल्याची माहिती पशुवैद्यकीय अधिकारी डाॅ. निखिल बनगर यांनी दिली. या सात पिल्लांची त्याच आठवड्यामध्ये त्यांच्या आईसोबत पुनर्भेट घडवून आणल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय महत्त्वाचे म्हणजे जानेवारी ते नोव्हेंबर, २०२१ या कालवधीत जुन्नर वन विभागाने आईपासून विभक्त झालेल्या २३ पिल्लांची पुन्हा आईसोबत भेट घडवून दिली आहे. या कामामुळे या पिल्लांचे (leopard cub) भविष्य पिंजऱ्यात कैद न होता नैसर्गिक अधिवासात त्यांच्या आईसमवेत व्यतित होत आहे.
 
उसातील बिबटे
उसाचे पीक हे दाट आणि भरगच्च असते. तसेच हे पीक एक ते दीड वर्ष राहत असल्याने बिबट्याने उसातच राहणे पसंत केले आहे. शेताला पाणी सोडले जात असल्याने बिबट्याच्या आवश्यक असणाऱ्या पाण्याचाही प्रश्न मार्गी लागला. शिवाय उसाच्या शेताबाहेर पडल्यावर त्याच शेतकर्‍यांची शेळी, मेंढी, कुत्रा इ. प्राणी खाद्य म्हणून त्यांना मिळते. याच कारणामुळे बिबट्याने उसाच्या शेतात कायमस्वरुपी अधिवास केला आहे.

@@AUTHORINFO_V1@@