सुशासनाच्या रामराज्याचे युग

    03-Nov-2021
Total Views | 73

devendra fadnvis_1 &




सुशासनाच्या रामराज्याचे युग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तब्बल १२ वर्षे गुजरात राज्याचे नेतृत्व केले व गेली साडेसात वर्षे देशाचे पंतप्रधान म्हणून काम करत आहेत. यानिमित्ताने ‘रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी’तर्फे दिल्लीतील ‘इंडिया इंटरनॅशनल सेंटर’ येथे ‘डिलेव्हरिंग डेमोक्रसी : रिव्ह्युव्हिंग द टू डिकेड्स ऑफ नरेंद्र मोदी अ‍ॅस हेड ऑफ गर्व्हमेंट’ या विषयावर दि.२७ऑक्टोबर ते २९ ऑक्टोबर दरम्यान तीनदिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. योगायोगाने याच वर्षी या सरकारचे नेतृत्व करणारे नरेंद्र मोदी यांच्या शासनप्रमुख म्हणून कार्यकाळाला २० वर्षे पूर्ण होत आहेत. मोदींच्या शासनप्रमुख म्हणून २० वर्षांच्या कारकिर्दीचा आढावा या परिषदेत घेण्यात आला. या परिषदेचा थोडक्यात वृत्तांत...




रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी’तर्फे ‘इंडिया इंटरनॅशनल सेंटर’ येथे ‘डिलेव्हरींग डेमोक्रसी: रिह्युव्हींग द टू डिकेडस ऑफ नरेंद्र मोदी अ‍ॅस हेड ऑफ गर्व्हमेंट’ विषयासंदर्भात परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेमध्ये शिक्षण व कौशल्य विकास, सामाजिक न्याय, महिला सशक्तीकरण, अंमलबजावणीची कला, विज्ञान व तंत्रज्ञान, हवामानबदल, अर्थशास्त्र, कल्याण आरोग्य व ‘कोविड’, कृषी कायदा सुधारणा, आंतरराष्ट्रीय संबंध व धोरण आदी विषयांवरील एकूण १२ सत्रे या तीन दिवसांत घेण्यात आली. याशिवाय एकूण ३५ नामांकित व्याख्यात्यांनी या परिषदेत आपली मते मांडली. गृहमंत्री अमित शाह, तसेच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या परिषदेला सुरुवात झाली. या परिषदेला लोकांनीदेखील उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. २१ राज्यांमधून १६८ लोक परिषदेत उपस्थित होते. परिषदेमध्ये अभ्यासपूर्ण मनोगत व्यक्त करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ”पं. दीनदयाळ उपाध्याय यांनी स्वराज्याचे तीन आयाम सांगितले आहेत. स्वराज्य म्हणजे असे राज्य ज्यात राज्यकर्ते त्या राज्याचे नागरिक असतील, राष्ट्रासाठी काम करण्याची राज्यकर्त्यांमध्ये इच्छा असेल आणि राष्ट्रहितअनुसार निर्णय घ्यायची राज्याच्या सरकारची क्षमता असेल. म्हणजेच ‘आत्मनिर्भता’ असल्याशिवाय खर्‍या अर्थाने स्वातंत्र्य मिळू शकत नाही, याच विचारांवर नरेंद्र मोदी याचे सरकार कार्यरत आहे. नरेंद्र मोदी भारताचे शासन (Governance) गुरु आहेत. त्यांनी शासनाची नवीन परिभाषा मांडली.”




परिषदेत पहिल्या सत्रात मोदी काळात शासनाच्या पद्धतींमध्ये काय बदल झाला, याची मीमांसा करण्यात आली. ‘स्वराज्य’ मासिकाचे संपादक आर. जगन्नाथन यांनी या सत्रात त्यांचे मत मांडले. दुसर्‍या सत्रात मोदी सरकारच्या गुजरातमधील व २०१४ नंतर संपूर्ण भारतातील विविध धोरणांच्या अंमलबजावणीवर प्रकाश टाकण्यात आला. यात नोकरशाहीत अनेक वर्ष सक्रियतेने काम केलेले हसमुख अढीया, ‘नवम कॅपिटल’चे राजीव मंत्री आणि ‘दलित चेंबर ऑफ कॉमर्स’चे मिलिंद कांबळे यांनी मोदींसोबत केलेल्या कामाचे अनुभव मांडले. पहिल्या दिवसाच्या तिसर्‍या सत्रात सामाजिक क्षेत्रात मोदींनी केलेल्या कामाचा ऊहापोह करण्यात आला. या सत्रात मारवाडी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संदीप संचेती, नागलँडचे खासदार किकॉन, ‘राष्ट्रीय कौशल मिशन’चे सदस्य मनीष सब्रवाल व वित्त खात्याचे विशेष सल्लागार संजीव सन्याल यांनी आपली मते मांडली.



परिषदेच्या दुसर्‍या दिवसाची सुरुवात ‘मोदीनॉमिक्स’ या विषयाने झाली. मोदींनी भारताच्या अर्थव्यवस्थेवर परिणामकारक ठरतील, असे अनेक निर्णय गेल्या सात वर्षांत घेतले. ‘नोटाबंदी’, ‘जीएसटी’, ‘डिजिटल पेमेंट्स’ इत्यादी निर्णयांवर या सत्रात चर्चा करण्यात आली. या सत्रात मुख्य आर्थिक सल्लागार डॉ. कृष्णमूर्ती सुब्रमण्यम व भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते बैजयंत जय पंडा यांनी विवेचन केले. मोदींनी गरिबांसाठी घेतलेल्या निर्णयांचे वैशिष्ट्य म्हणजे गरिबांना अर्थार्जनासोबतच मान मिळेल, यासाठीसुद्धा प्रयत्न करण्यात आले. २०१४ साली सर्वप्रथम देशाचे पंतप्रधान म्हणून केलेल्या भाषणात त्यांनी हे गरिबांचे सरकार आहे, असा उल्लेख केला. हा उल्लेख केवळ भाषणापुरता मर्यादित न राहता त्यांनी घेतलेल्या निर्णयांमधूनदेखील दिसतो, असे सर्व वक्त्यांनी अनेक उदाहरणांसह मांडले. या सत्रात राज्यसभा सदस्य सुशील मोदी, ‘बॉम्बे स्टॉक एक्सचेंज’चे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष कुमार चौहान, ‘ऑरोव्हील फाऊंडेशन’च्या सचिव जयंती रवी व ‘नीति आयोगा’चे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी सहभाग घेतला. दुसर्‍या दिवसाच्या तिसर्‍या सत्रात विज्ञान-तंत्रज्ञान व हवामान बदलाबाबत घेतलेल्या निर्णयांवर प्रकाश टाकण्यात आला. या सत्रात ‘कौन्सिल ऑफ सायन्टिफिक अ‍ॅण्ड इंडस्ट्रियल रिसर्चच’े डॉ. शेखर मांडे, ‘अक्षय ऊर्जा’चे अध्यक्ष सुमंत सिन्हा, गुंतवणूकदार आणि लेखक हर्ष मधुसूदन व घझखढ ग्रुपचे अध्यक्ष रवी पंडित यांनी आपली मते मांडली. दुसर्‍या दिवसाच्या चौथ्या सत्रात कृषी क्षेत्रात सरकारने केलेल्या सुधारणांबाबत चर्चा करण्यात आली. शेतीसंबंधी नव्याने मंजूर पारित केलेल्या तीन कायद्यांचा ऊहापोह या सत्रात करण्यात आला. राष्ट्रीय सिंगापूर विद्यापीठातील डॉ. मुकुल अशर यांनी ‘ऑडिओ-व्हिज्युअल’ माध्यमांद्वारे या सत्रात सहभाग घेतला. याशिवाय "National Rainfed Area Authority (NRAA)'चे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक दलवाई, सामाजिक कार्यकर्ते व माजी आमदार पाशा पटेल, मत्स्योद्योग खात्याचे मंत्री पर्शोत्तम रुपाला यांनीदेखील आपली मते मांडली. दुसर्‍या दिवसाच्या शेवटच्या म्हणजेच पाचव्या सत्रात ‘विदेशनीती’विषयी विवेचन करण्यात आले. ‘विदेशनीती’ हा मोदीजींच्या सर्वात जवळचा आणि सर्वात जास्त यशस्वी झालेली नीती आहे. भारताबाबत संपूर्ण जगाचे मत सकारात्मक करण्यासाठी मोदींनी विविध प्रकारे प्रयत्न केले. आफ्रिका व आग्नेय आशियातील देशांशी संबंध जोडणे, अनिवासी भारतीयांना भारताशी जोडणे, भारताच्या ‘सॉफ्ट’ व ‘हार्ड पॉवर’ला समान महत्त्व देणे यांसारखे अनेक निर्णय मोदींनी घेतले. या सत्रात माजी मुत्सद्दी लक्ष्मी पुरी, Gateway House च्या कार्यकारी संचालक मनजित क्रिपलानी, माजी मुत्सद्दी सुजन चिनॉय, श्रीनगर विद्यापीठाचे कुलगुरू सय्यद आता हुसेन यांनी सहभाग नोंदवला. मनजित क्रिपलानी यांनी त्यांच्या भाषणात म्हटल्याप्रमाणे मोदींनी भारतीय संस्कृतीतील ‘वसुधैव कुटुंबकम्’ या तत्त्वाला जगभरात नेतानाच ‘आत्मनिर्भर’ भारतवर विशेष लक्ष दिले हे त्यांचे सगळ्यात महत्वाचे व मोठे यश आहे.









 या परिषदेच्या शेवटच्या दिवशी तीन सत्रे झाली. यातील पहिल्या सत्रात आरोग्य व ‘कोविड’ व्यवस्थापन यावर विवेचन करण्यात आले. आरोग्य क्षेत्रात करण्यात आलेले बदल, विविध निर्णय तसेच ‘कोविड’चे व्यवस्थापन यावर या सत्रात चर्चा करण्यात आली. भारताने ‘कोविड’ व्यवस्थापनात जगातील सर्व देशांना मागे टाकत केवळ ‘कोविड’चा प्रसार रोखला नाही, तर लस व औषधांची निर्मिती करून केवळ भारतीयांनाच नव्हे, तर संपूर्ण जगाला लसीकरणाचा फायदा कसा मिळेल, याबाबत ठोस पावले उचलली. ‘ब्रूकिंग्स’ संस्थेतील ‘रिचर्स फेलो’ शमिका रवी आणि ‘नीति आयोगा’चे सदस्य डॉ. विनोद पॉल यांनी या सत्रात सहभाग नोंदवला. डॉ. विनोद पॉल यांनी भारतात सध्या सहा लसी देता येत आहेत, शिवाय अजून दोन लसी लवकरात लवकर उपलब्ध होणार असल्याचे म्हटले. या दिवसाच्या दुसर्‍या सत्रात सामाजिक न्याय आणि महिला सशक्तीकरण यावर चर्चा करण्यात आली. स्त्री ही ‘आदिशक्ती’ आहे. परंतु, शतकानुशतके स्त्रियांकडे दुर्लक्ष झाल्यामुळे आज त्यांना पायाभूत सुविधा मिळण्यासाठीदेखील लढावे लागत आहे. म्हणून मोदींनी ‘स्वच्छ भारत अभियाना’अंतर्गत घरगुती तसेच सार्वजनिक शौचालय निर्मिती, ‘उज्ज्वला अभियान’ यांसारखी सामान्य स्त्रीच्या जीवनातील प्रश्नांना सोडवण्याच्या दृष्टीने पावले उचलली. यासत्रात ‘बीपीएस महिला विद्यापीठा’च्या माजी कुलगुरू डॉ. सुषमा यादव, पाटणा विद्यापीठाचे प्राध्यापक गुरू प्रकाश पासवान, ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स’चे संचालक डॉ. वीरेंद्र मिश्रा आणि गुजरात शासनाचे मुख्य सचिव अनिल मुकीम सहभागी झाले होते. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या तीन दिवसीय परिषदेचा समारोप रक्षा मंत्री राजनाथ सिंह यांच्या भाषणाने झाला. नरेंद्र मोदींची शासनप्रमुख म्हणून २० वर्षे म्हणजे सुशासन आणि विकासाची यात्रा या शब्दांत त्यांनी मोदींच्या कार्याचे कौतुक केले. गुजरातचे मुख्यमंत्री असताना मोदींनी इतर देशांमधील गुंतवणूकदारांना गुजरातमध्ये आमंत्रित करून आर्थिक वाढ साध्य केली. यामुळेच आज संपूर्ण भारतात गुजरात उद्योग आणि उद्योगशीलातेसाठी प्रसिद्ध आहे. ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास’ या मंत्रानुसार मोदींच्या नेतृत्त्वाखाली भारत प्रगती करत असल्याचे राजनाथ सिंह यांनी सांगितले.




(लेखिका ‘पार्क’च्या ईशान्य भारतातील प्रकल्पांच्या प्रभारी आहेत)सुशासनाच्या रामराज्याचे युग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तब्बल १२ वर्षे गुजरात राज्याचे नेतृत्व केले व गेली साडेसात वर्षे देशाचे पंतप्रधान म्हणून काम करत आहेत. यानिमित्ताने ‘रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी’तर्फे दिल्लीतील ‘इंडिया इंटरनॅशनल सेंटर’ येथे ‘डिलेव्हरिंग डेमोक्रसी : रिव्ह्युव्हिंग द टू डिकेड्स ऑफ नरेंद्र मोदी अ‍ॅस हेड ऑफ गर्व्हमेंट’ या विषयावर दि.२७ ऑक्टोबर ते २९ ऑक्टोबर दरम्यान तीनदिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. योगायोगाने याच वर्षी या सरकारचे नेतृत्व करणारे नरेंद्र मोदी यांच्या शासनप्रमुख म्हणून कार्यकाळाला २० वर्षे पूर्ण होत आहेत. मोदींच्या शासनप्रमुख म्हणून २० वर्षांच्या कारकिर्दीचा आढावा या परिषदेत घेण्यात आला. या परिषदेचा थोडक्यात वृत्तांत...



मभाऊ म्हाळगी प्रबोधिनी’तर्फे ‘इंडिया इंटरनॅशनल सेंटर’ येथे ‘डिलेव्हरींग डेमोक्रसी: रिह्युव्हींग द टू डिकेडस ऑफ नरेंद्र मोदी अ‍ॅस हेड ऑफ गर्व्हमेंट’ विषयासंदर्भात परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेमध्ये शिक्षण व कौशल्य विकास, सामाजिक न्याय, महिला सशक्तीकरण, अंमलबजावणीची कला, विज्ञान व तंत्रज्ञान, हवामानबदल, अर्थशास्त्र, कल्याण आरोग्य व ‘कोविड’, कृषी कायदा सुधारणा, आंतरराष्ट्रीय संबंध व धोरण आदी विषयांवरील एकूण १२ सत्रे या तीन दिवसांत घेण्यात आली. याशिवाय एकूण ३५ नामांकित व्याख्यात्यांनी या परिषदेत आपली मते मांडली. गृहमंत्री अमित शाह, तसेच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या परिषदेला सुरुवात झाली. या परिषदेला लोकांनीदेखील उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. २१ राज्यांमधून १६८ लोक परिषदेत उपस्थित होते. परिषदेमध्ये अभ्यासपूर्ण मनोगत व्यक्त करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ”पं. दीनदयाळ उपाध्याय यांनी स्वराज्याचे तीन आयाम सांगितले आहेत. स्वराज्य म्हणजे असे राज्य ज्यात राज्यकर्ते त्या राज्याचे नागरिक असतील, राष्ट्रासाठी काम करण्याची राज्यकर्त्यांमध्ये इच्छा असेल आणि राष्ट्रहितअनुसार निर्णय घ्यायची राज्याच्या सरकारची क्षमता असेल. म्हणजेच ‘आत्मनिर्भता’ असल्याशिवाय खर्‍या अर्थाने स्वातंत्र्य मिळू शकत नाही, याच विचारांवर नरेंद्र मोदी याचे सरकार कार्यरत आहे. नरेंद्र मोदी भारताचे शासन (र्ॠेींशीपरपलश) गुरु आहेत. त्यांनी शासनाची नवीन परिभाषा मांडली.”




परिषदेत पहिल्या सत्रात मोदी काळात शासनाच्या पद्धतींमध्ये काय बदल झाला, याची मीमांसा करण्यात आली. ‘स्वराज्य’ मासिकाचे संपादक आर. जगन्नाथन यांनी या सत्रात त्यांचे मत मांडले. दुसर्‍या सत्रात मोदी सरकारच्या गुजरातमधील व २०१४ नंतर संपूर्ण भारतातील विविध धोरणांच्या अंमलबजावणीवर प्रकाश टाकण्यात आला. यात नोकरशाहीत अनेक वर्ष सक्रियतेने काम केलेले हसमुख अढीया, ‘नवम कॅपिटल’चे राजीव मंत्री आणि ‘दलित चेंबर ऑफ कॉमर्स’चे मिलिंद कांबळे यांनी मोदींसोबत केलेल्या कामाचे अनुभव मांडले. पहिल्या दिवसाच्या तिसर्‍या सत्रात सामाजिक क्षेत्रात मोदींनी केलेल्या कामाचा ऊहापोह करण्यात आला. या सत्रात मारवाडी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संदीप संचेती, नागलँडचे खासदार किकॉन, ‘राष्ट्रीय कौशल मिशन’चे सदस्य मनीष सब्रवाल व वित्त खात्याचे विशेष सल्लागार संजीव सन्याल यांनी आपली मते मांडली.


 
परिषदेच्या दुसर्‍या दिवसाची सुरुवात ‘मोदीनॉमिक्स’ या विषयाने झाली. मोदींनी भारताच्या अर्थव्यवस्थेवर परिणामकारक ठरतील, असे अनेक निर्णय गेल्या सात वर्षांत घेतले. ‘नोटाबंदी’, ‘जीएसटी’, ‘डिजिटल पेमेंट्स’ इत्यादी निर्णयांवर या सत्रात चर्चा करण्यात आली. या सत्रात मुख्य आर्थिक सल्लागार डॉ. कृष्णमूर्ती सुब्रमण्यम व भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते बैजयंत जय पंडा यांनी विवेचन केले. मोदींनी गरिबांसाठी घेतलेल्या निर्णयांचे वैशिष्ट्य म्हणजे गरिबांना अर्थार्जनासोबतच मान मिळेल, यासाठीसुद्धा प्रयत्न करण्यात आले. २०१४  साली सर्वप्रथम देशाचे पंतप्रधान म्हणून केलेल्या भाषणात त्यांनी हे गरिबांचे सरकार आहे, असा उल्लेख केला. हा उल्लेख केवळ भाषणापुरता मर्यादित न राहता त्यांनी घेतलेल्या निर्णयांमधूनदेखील दिसतो, असे सर्व वक्त्यांनी अनेक उदाहरणांसह मांडले. या सत्रात राज्यसभा सदस्य सुशील मोदी, ‘बॉम्बे स्टॉक एक्सचेंज’चे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष कुमार चौहान, ‘ऑरोव्हील फाऊंडेशन’च्या सचिव जयंती रवी व ‘नीति आयोगा’चे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी सहभाग घेतला. दुसर्‍या दिवसाच्या तिसर्‍या सत्रात विज्ञान-तंत्रज्ञान व हवामान बदलाबाबत घेतलेल्या निर्णयांवर प्रकाश टाकण्यात आला. या सत्रात ‘कौन्सिल ऑफ सायन्टिफिक अ‍ॅण्ड इंडस्ट्रियल रिसर्चच’े डॉ. शेखर मांडे, ‘अक्षय ऊर्जा’चे अध्यक्ष सुमंत सिन्हा, गुंतवणूकदार आणि लेखक हर्ष मधुसूदन व घझखढ ग्रुपचे अध्यक्ष रवी पंडित यांनी आपली मते मांडली. दुसर्‍या दिवसाच्या चौथ्या सत्रात कृषी क्षेत्रात सरकारने केलेल्या सुधारणांबाबत चर्चा करण्यात आली. शेतीसंबंधी नव्याने मंजूर पारित केलेल्या तीन कायद्यांचा ऊहापोह या सत्रात करण्यात आला. राष्ट्रीय सिंगापूर विद्यापीठातील डॉ. मुकुल अशर यांनी ‘ऑडिओ-व्हिज्युअल’ माध्यमांद्वारे या सत्रात सहभाग घेतला. याशिवाय ‘छरींळेपरश्र ठरळपषशव ईशर र्ईींहेीळीूं (छठअअ)’चे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक दलवाई, सामाजिक कार्यकर्ते व माजी आमदार पाशा पटेल, मत्स्योद्योग खात्याचे मंत्री पर्शोत्तम रुपाला यांनीदेखील आपली मते मांडली.




दुसर्‍या दिवसाच्या शेवटच्या म्हणजेच पाचव्या सत्रात ‘विदेशनीती’विषयी विवेचन करण्यात आले. ‘विदेशनीती’ हा मोदीजींच्या सर्वात जवळचा आणि सर्वात जास्त यशस्वी झालेली नीती आहे. भारताबाबत संपूर्ण जगाचे मत सकारात्मक करण्यासाठी मोदींनी विविध प्रकारे प्रयत्न केले. आफ्रिका व आग्नेय आशियातील देशांशी संबंध जोडणे, अनिवासी भारतीयांना भारताशी जोडणे, भारताच्या ‘सॉफ्ट’ व ‘हार्ड पॉवर’ला समान महत्त्व देणे यांसारखे अनेक निर्णय मोदींनी घेतले. या सत्रात माजी मुत्सद्दी लक्ष्मी पुरी, ॠरींशुरू र्केीीश च्या कार्यकारी संचालक मनजित क्रिपलानी, माजी मुत्सद्दी सुजन चिनॉय, श्रीनगर विद्यापीठाचे कुलगुरू सय्यद आता हुसेन यांनी सहभाग नोंदवला. मनजित क्रिपलानी यांनी त्यांच्या भाषणात म्हटल्याप्रमाणे मोदींनी भारतीय संस्कृतीतील ‘वसुधैव कुटुंबकम्’ या तत्त्वाला जगभरात नेतानाच ‘आत्मनिर्भर’ भारतवर विशेष लक्ष दिले हे त्यांचे सगळ्यात महत्वाचे व मोठे यश आहे. या परिषदेच्या शेवटच्या दिवशी तीन सत्रे झाली. यातील पहिल्या सत्रात आरोग्य व ‘कोविड’ व्यवस्थापन यावर विवेचन करण्यात आले. आरोग्य क्षेत्रात करण्यात आलेले बदल, विविध निर्णय तसेच ‘कोविड’चे व्यवस्थापन यावर या सत्रात चर्चा करण्यात आली. भारताने ‘कोविड’ व्यवस्थापनात जगातील सर्व देशांना मागे टाकत केवळ ‘कोविड’चा प्रसार रोखला नाही, तर लस व औषधांची निर्मिती करून केवळ भारतीयांनाच नव्हे, तर संपूर्ण जगाला लसीकरणाचा फायदा कसा मिळेल, याबाबत ठोस पावले उचलली. ‘ब्रूकिंग्स’ संस्थेतील ‘रिचर्स फेलो’ शमिका रवी आणि ‘नीति आयोगा’चे सदस्य डॉ. विनोद पॉल यांनी या सत्रात सहभाग नोंदवला. डॉ. विनोद पॉल यांनी भारतात सध्या सहा लसी देता येत आहेत, शिवाय अजून दोन लसी लवकरात लवकर उपलब्ध होणार असल्याचे म्हटले.




 या दिवसाच्या दुसर्‍या सत्रात सामाजिक न्याय आणि महिला सशक्तीकरण यावर चर्चा करण्यात आली. स्त्री ही ‘आदिशक्ती’ आहे. परंतु, शतकानुशतके स्त्रियांकडे दुर्लक्ष झाल्यामुळे आज त्यांना पायाभूत सुविधा मिळण्यासाठीदेखील लढावे लागत आहे. म्हणून मोदींनी ‘स्वच्छ भारत अभियाना’अंतर्गत घरगुती तसेच सार्वजनिक शौचालय निर्मिती, ‘उज्ज्वला अभियान’ यांसारखी सामान्य स्त्रीच्या जीवनातील प्रश्नांना सोडवण्याच्या दृष्टीने पावले उचलली. यासत्रात ‘बीपीएस महिला विद्यापीठा’च्या माजी कुलगुरू डॉ. सुषमा यादव, पाटणा विद्यापीठाचे प्राध्यापक गुरू प्रकाश पासवान, ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स’चे संचालक डॉ. वीरेंद्र मिश्रा आणि गुजरात शासनाचे मुख्य सचिव अनिल मुकीम सहभागी झाले होते. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या तीन दिवसीय परिषदेचा समारोप रक्षा मंत्री राजनाथ सिंह यांच्या भाषणाने झाला. नरेंद्र मोदींची शासनप्रमुख म्हणून २० वर्षे म्हणजे सुशासन आणि विकासाची यात्रा या शब्दांत त्यांनी मोदींच्या कार्याचे कौतुक केले. गुजरातचे मुख्यमंत्री असताना मोदींनी इतर देशांमधील गुंतवणूकदारांना गुजरातमध्ये आमंत्रित करून आर्थिक वाढ साध्य केली. यामुळेच आज संपूर्ण भारतात गुजरात उद्योग आणि उद्योगशीलातेसाठी प्रसिद्ध आहे. ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास’ या मंत्रानुसार मोदींच्या नेतृत्त्वाखाली भारत प्रगती करत असल्याचे राजनाथ सिंह यांनी सांगितले.




- मुग्धा वहाळकर
(लेखिका ‘पार्क’च्या ईशान्य भारतातील प्रकल्पांच्या प्रभारी आहेत)








अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121