ठाणे : 2021 रोजी कचर्याचे संकलन व त्याची वाहतूक, प्रक्रिया, साफसफाई, जनजागृती, क्षमतावृद्धी आदी निकषांवर ‘स्वच्छ सर्वेक्षण अभियान’ राबविण्यात आले होते. या सर्वेक्षणामध्ये 2020 साली ठाणे शहराने 57व्या क्रमांकावरून देशात 14व्या क्रमांकावर आघाडी घेतली होती, तर सन 2021 साली हाच क्रमांक राखण्यात यश आले आहे. दरम्यान,राज्यात स्वच्छ सर्वेक्षणात ठाणे शहराने तिसरा क्रमांक पटकवला आहे. या यशाबद्दल महापौर, आयुक्तांसह ठाणेकरांकडून घनकचरा व्यवस्थापन टीमचे अभिनंदन होत आहे.
कचरामुक्त शहर आणि कचर्याचे योग्य व्यवस्थापन करणार्या ठाणे महापालिकेला ’थ्री स्टार’ मानांकन मिळाले आहे. केंद्र सरकारकडून देशभरातील महापालिकांंचे विविध निकषांवर सर्वेक्षण करण्यात आले. त्यामध्ये ठाणे महापालिकेने बाजी मारली. केंद्रीय नगरविकास आणि शहर कामकाज विभागाचे सचिव दुर्गाशंकर मिश्र यांच्याहस्ते नवी दिल्लीत हा सन्मान महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, आणि घनकचरा उपायुक्त अशोक बुरपल्ले यांनी स्वीकारला.