जांबोरी मैदानातील ज्येष्ठ नागरिक कट्टा तोडण्याच्या हालचाली

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Nov-2021   
Total Views |
 
katta_1  H x W:
 
 
मुंबई : मागील अनेक वर्षांपासून पुनर्विकासासाठी रखडलेल्या बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील अडचणींची मालिका संपता संपत नाही असे चित्र दिसतानाच आता आणखी एक समस्या बीडीडी परिसरातील ज्येष्ठ नागरिकांच्या समोर आ वासून उभी राहिली आहे. जांभोरी मैदानात व्यायाम करण्यासाठी आणि विरंगुळा म्हणून फेरफटका मारण्यासाठी येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी ज्येष्ठ नागरिक कट्टा बांधण्यात आलेला आहे. मात्र, मागील काही दिवसांपासून हा कट्टा तोडण्याच्या दिशेने हालचाली सुरु झाल्या असून याबाबत ज्येष्ठ नागरिकांनी आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त केली आहे.
 
 
 
महापालिकेच्या अनेकांना नोटिसा
जांबोरी मैदान परिसरात अस्तित्वात असलेल्या अनेक आस्थापना उदा. दुकाने व इतर अन्य सर्वाना महापालिकेच्या वतीने नोटीस बजावण्यात आल्या आहेत. त्यात मैदानावरील ज्येष्ठ नागरिक कट्ट्याचा देखील समावेश आहे. दुकानांसह इतर आस्थापना आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी बांधण्यात आलेल्या कट्ट्या तोडण्यासाठी महापालिकेतर्फे हलकचली सुरु करण्यात आल्या आहेत, असे स्थानिक रहिवासी आणि दक्षिण मुंबई भाजपचे जिल्हा सरचिटणीस दीपक सावंत यांनी 'दै. मुंबई तरुण भारत'शी बोलताना म्हटले आहे.
 
 
 
पालिकेतर्फे कागदपत्रांची मागणी
ज्येष्ठ नागरिक कट्टा तोडण्याबाबत महापालिकेतर्फे नोटीस बजाविण्यात आली आहे. याबाबत महापालिकेकडे चौकशी केली असता प्रशासनाने ज्येष्ठ नागरिक कट्ट्याबाबत लेखी कागदपत्रांची मागणी केली आहे, असे स्थानिक नागरिकांनी म्हटले आहे.
 
 
 
स्थानिकांचा विरोध
दरम्यान, महापालिका प्रशासनातर्फे बजाविण्यात आलेल्या या नोटीसवर स्थानिक ज्येष्ठ नागरिकांनी नाराजी व्यक्त केली असून पालिकेच्या या भूमिकेला विरोध केला आहे. त्यामुळे आधीच वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या बीडीडी चाळ आणि जांभोरी मैदानाशी आणखी एक वाद जोडला जाणार की हा प्रश्न लवकर मार्गी लागणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@