होमियोपॅथीचे शिक्षण आणि भेदभाव

    26-Oct-2021
Total Views | 74

homeopathy_1  H



होमियोपॅथीसाठी पूर्वी स्वतंत्र विभाग सरकार दरबारी नव्हता. जसे आपण पाहिले की, आयुर्वेदसंचालनालयच होमियोपॅथीला नियंत्रित करत होते. त्यानंतर पुढील काळात ‘आयुष’ मंत्रालयाची स्थापना झाली व त्यानुसार होमियोपॅथीला ‘आयुष’ मंत्रालयात जागा मिळाली. परंतु, केवळ ‘आयुष’मध्ये समावेश होऊन काहीही झाले नाही, तर हा सापत्नभाव चालूच राहिला.होमियोपॅथीमध्ये शिकणारा विद्यार्थी हा ‘एमबीबीएस’ला शिकणार्‍या विद्यार्थ्याप्रमाणे सर्वच विषय शिकत असतो.




 उदा. प्रथम वर्षात ‘अ‍ॅनाटॉमी’, ‘फिजिओलॉजी’, द्वितीय वर्षात ‘पॅथोलॉजी’ व ‘फॉरेन्सिक मेडिसीन’ आणि ‘टॉक्सिकोलॉजी’ नंतर, ‘प्रीव्हेंटिव्ह अ‍ॅण्ड सोशल मेडिसीन’ आणि तिसर्‍या वर्षी शल्यचिकित्सा म्हणजेच सर्जरी व शेवटच्या वर्षी ‘मेडिसीन’ ज्यात सर्व अवयवांचा व आजारांचा समावेश होतो, तसेच ‘गायनॅकोलॉजी’ व जर्लीीीींलींर्ळींशहा विषयही खोलात जाऊन शिकवला जातो.याच्या व्यतिरिक्त होमियोपॅथीचे विषय असावा,जसे ‘ऑरगॅनॉन ऑफ मेडिसीन’ ‘होमियोपॅथिक मटेरिया मेडिका’ होमियोपॅथिक औषध निर्माणशास्त्र (फार्मसी) आणि ‘होमियोपॅथिक रेपरटोरी.’ इतका सर्व अभ्यास करूनही होमियोपॅथिक डॉक्टरांना सर्जरी करू देण्यासाठी ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’ नावाच्या अ‍ॅलोपॅथीच्या संस्थेचा विरोध आहे व ही संस्था इतकी शक्तिशाली आहे की, त्यांच्या पुढे आयुष मंत्रालयाचेही काही चालत नाही, असे दिसते.




म्हणूनच होमियोपॅथीच्या डॉक्टरांना ‘एमएस’ (सर्जरीची पदवी) घेऊ दिली जात नाही. मध्यंतरी आयुर्वेदिक डॉक्टरांना जेव्हा सर्जरीची परवानगी देण्यात येणार होती, त्यावेळेसही या ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’ने त्याला प्रचंड विरोध केला.दुसरी कोणतीही औषध प्रणाली चांगले कार्य करू शकते, हेच या लोकांना मान्य नाही. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे, होमियोपॅथीची महाविद्यालये अशी आहेत की, जी होमियोपॅथीच्या विकासासाठी काही विशेष प्रयत्न करताना दिसत नाहीत आणि त्यामुळे या अतिशय परिणामकारक व नैसर्गिक औषधशास्त्राला दुय्यमपणा येतो व अनैसर्गिक व ‘केमिकल्स’ असलेली औषध सर्वांच्या माथी मारण्यात येतात.होमियोपॅथीच्या विकासाठी व संशोधनासाठी वैद्यकीय महाविद्यालयांनी पुढाकार घ्यायला हवा. वर्षानुवर्षे पारंपरिक गोष्टी न करता काळानुसार अभ्यासक्रम व शिक्षणात बदल करायला हवा. ‘ऑरगॅनॉन ऑफ मेडिसीन’ व ‘होमियोपॅथिक मटेरिया मेडिका’ यावर संशोधन व्हायला हवे, तरच पुढील काळात होमियोपॅथी ही लोकांची पहिली पसंत असेल. या अनुषंगाने अनेक होमियोपॅथिक डॉक्टर्स काम करत आहेत. याबद्दल आपण पुढील भागात माहिती करुन घेऊया.




- डॉ. मंदार पाटकर
(लेखक एमडी होमियोपॅथी आहेत.)












अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121