कसा पोहोचला बिटकॉईन ६२ हजार डॉलर्सवर?

    18-Oct-2021
Total Views | 127

Bitcoinf _1  H

नवी दिल्ली : बिटकॉईनची किंमत ६२ हजार डॉलर्सच्या पार पोहोचली आहे. सध्या ६२ हजार ७० डॉलर्स इतकी उसळी घेऊन ट्रेड करत आहे. यापूर्वीच बिटकॉईनने ६० हजारांचा पल्ला गाठला होता. एप्रिल २०२१मध्ये बिटकॉईनची किंमत इतकी वाढली होती.
 
 
 
याच महिन्यांत झाली २९ टक्क्यांनी वाढ
 
ऑक्टोबर महिन्यात १८ दिवसांतच बिटकॉईन २९ टक्क्यांनी वधारला. १ ऑक्टोबर रोजी बिटकॉईनची किंमत ही ४८ हजार १६० डॉलर होती. याशिवाय अन्य अन्य क्रिप्टो करंन्सीचा विचार केला तर एथेरियम १ ऑक्टोबर रोजी ३,३०६ डॉलरवर होता. सध्या त्याचे मुल्य ३ हजार ८५१ डॉलर्सवर आहे. पोलकाडाट नावाची डिजिटल करन्सी ४२ डॉलर्सवर पोहोचली आहे. १ ऑक्टोबर रोजी ही ४२ डॉलर्सवर पोहोचली होती.
 
  
डिजिटल करन्सीमध्ये इतकी वृद्धी का होतेय?
 
अमेरिकन रेगुलेटर्सने क्रिप्टोकरन्सींच्या वापरासाठी हिरवा झेंडा दाखविण्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळेच बिटकॉईनमध्ये तेजी नोंदविण्यात आली आहे. आकडेवारीनुसार, डिजिटल करन्सी एका महिन्यात २८.७४ टक्क्यांनी वधारली. ६२ हजार ७० रुपयांवर पोहोचलेला बिटकॉईन सध्या तेजीत आहे. अमेरिकी सिक्योरिटी अॅण्ड एक्सचेंज कमिशनतर्फे (SEC) ETF पुढील आठवड्यात ही मंजूरी मिळू शकते.
 
बिटकॉईन आणखी तेजीत!
गुंतवणूक तज्ज्ञांच्याी मते, बिटकॉईनच्या किंमतीत आणखी वृद्धी होऊ शकते. पुढील वर्षांत ९० हजार डॉलर्सपर्यंतचा टप्पा पार केलाी जाऊ शकतो. बिटकॉईनचा सर्वात मोठा पल्ला हा ६० हजार कॉईन्सचाच होता. तीन महिन्यांपूर्वी याची किंमत ३२ हजारांपर्यंत पोहोचली होती. तर पोलकाडाट या क्रिप्टोकरन्सीची किंमत २२ हजार डॉलर्सपर्यंत पोहोचली होती. भारतात १२-१४ क्रिप्टो एक्सचेंजचा कारभार केला जातो. भारतात क्रिप्टोकरेंसीचा दररोजची उलाढाल ही १००० ते १५०० कोटींपर्यंत आहे. देशात क्रिप्टो करन्सीची एकूण १ ते १.२० कोटी गुंतवणूकदार आहेत.
 

क्रिप्टो करन्सी म्हणजे काय ?
 
 
रुपये, डॉलर, येन आwणि पाऊंड प्रमाणेच याचे मुल्य ठरते. एका चलनासारखेच एक आभासी चलन आहे. क्रिप्टोग्राफीच्या सिद्धांतांनुसार, ही यंत्रणा काम करते. ब्लॉकचेन टेक्नोलॉजीद्वारेच ही निर्मिती होत असते. त्यामुळेच या व्हर्च्युअल करन्सी क्रिप्टोकरेन्सी म्हटले जाते.




अग्रलेख
जरुर वाचा
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्ष पदार्पणानिमित्त विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन शिबिर ; पनवेल एमकेसीएलच्या वतीने आयोजन

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्ष पदार्पणानिमित्त विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन शिबिर ; पनवेल एमकेसीएलच्या वतीने आयोजन

दानशूर व्यक्तिमत्त्व आणि माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी त्यांच्या वयाच्या ७५ व्या अर्थात अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण केले असून त्या निमित्ताने विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन केले आहे. याच उपक्रमांतर्गत महाराष्ट्र ज्ञान महामंडळ(एमकेसीएल) पनवेल यांच्या वतीने पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील इयत्ता दहावी आणि बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी 'भरारी २०२५' हे करिअर विषयक मोफत मार्गदर्शन शिबीर पनवेल येथे आज (दि. १०) आयोजित करण्यात आले...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121