१,५३,७७,१९,७५,००० रुपये ! वाचलात ? इतकी आहे वाड्रांची घोषित संपत्ती

    06-Jan-2021
Total Views | 867

Robert wadra_1  



नवी दिल्ली : काँग्रेस नेत्या प्रियांका गांधींचे पती व देशातील दिग्गज उद्योगपती रॉबर्ड वाड्रा यांची आयकर विभागातर्फे दोन दिवस चौकशी सुरू आहे. ही चौकशी बेनामी संपत्तीच्या प्रकरणात वाड्रा अडचणीत सापडले आहेत. त्यांची बेनामी संपत्ती किती आहे याचा अद्याप तपास लागलेला नाही.
 
 
 
मात्र, त्यांनी घोषित केलेली संपत्ती इतकी आहे की, पहिल्या प्रयत्नात हा आकडा कुणीही वाचू शकणार नाही. सेलिब्रिटींच्या संपत्तीची माहिती देणाऱ्या एका संकेतस्थळाने ही वाड्रांची संपत्ती जाहीर केली आहे. 'सेलिब्रिटी नेटवर्थ डॉट कॉम' या वेबसाईटच्या मते, रॉबर्ड वाड्रांची नेट वर्थ २.१ अब्ज डॉलर्स इतकी आहे. हा आकडा रुपयांत (१,५३,७७,१९,७५,००० रुपये) इतकी सांगण्यात येत आहे.
 
 
५१ वर्षीय रॉबर्ड वाड्रा काँग्रेसच्या काळातील एक दिग्गज उद्योगपती मानले जात. ज्वेलरी निर्यात, रियल इस्टेट, हॉटेल्स, एयरक्राफ्ट आदी कित्येक व्यावसायांचा सामावेश आहे. रिअल इस्टेट क्षेत्रातील भारतातील एक अग्रगण्य कंपनी असलेल्या डीएलएफमध्ये वाड्रांची पार्टनरशीप आहे.
 
 
हॉटेल व्यावसायाचे विणले जाळे
 
राबर्ड वाड्रा यांच्या संपत्तीत हॉटेल्स व्यवसायाचा मोठा हातभार आहे. एका अहवालानुसार, वाड्रांचा हॉटेल व्यावसाय दिल्लीसह देशभरातील महत्वाच्या शहरांमध्ये पसरला आहे. स्वर्णअलंकार निर्यात करणारी कंपनी आर्टेक्समध्ये वाड्रा यांची मोठी हिस्सेदारी आहे. सेलिब्रिटी नेटवर्थच्या नुसार, वाड्रा एअरक्राफ्ट व्यावसायातही उतरले होते.
 
 
व्यावसायात कुठेकुठे वाटा ?
 
 
रिअल इस्टेट, अलंकार निर्यात, हॉटेल, एव्हीएशन या शिवाय वाड्रा स्काय लाइट हॉस्पिटलिटीचेही मालक आहेत. त्या कंपनीत वाड्रांची आई भागीदार आहे. डीएलएफशिवा. वाड्रांकडे युनिटेक कंपनीची २० टक्के भागीदारी आहे. देशातील चर्चित २ जी घोटाळ्यात युनिटेकचे नाव आले होते.
 
 
वाड्रा अडचणीत का आले ?
 
आयकर विभाग आणि अंमलबजावणी संचलनालय (ईडी) दोन्हीही रॉबर्ट वाड्रांविरोधात मनी लाँड्रींग प्रबंधित कायद्याअंतर्गत (PMLA) ही चौकशी सुरू आहे. वाड्रांवर लंडनमध्ये १२, ब्रायन्सन स्वैअरमध्ये प्रॉपर्टी खरेदीसाठी मनी लाँड्रीग केल्याचा आरोप आहे. या कारवाईला विरोध करत हे आरोप बिनबुडाचे आहेत, अशी भूमिका वाड्रांनी घेतली आहे.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121