'सर्वे सन्तु निरामया:' ; कोरोनलसीची पहिली बॅच रवाना

    12-Jan-2021
Total Views | 103

covishild_1  H


पुणे :
आजपासून पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटने कोरोना लसीच्या पुरवठयास सुरुवात केली आहे. पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमधून कोविशिल्ड लसीच्या पहिल्या बॅचचे ट्रक पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास विमानतळाच्या दिशेने रवाना झाले आहेत. पोलिसांनी सीरम इन्स्टिट्यूटपासून या वाहनाला एअरपोर्टपर्यंत सुरक्षा पुरवली. त्याआधी पोलिसांकडून लस घेऊन जाणाऱ्या या गाडीची पुजाही करण्यात आली. ही लस पुणे एअरपोर्टवरुन कार्गो विमानांद्वारे देशभरात पाठवली जाणार आहे. आज अशाप्रकारची आणखी तीन वाहनं लसीचे डोस घेऊन पुणे एअरपोर्टला रवाना होणार आहेत. काल केंद्र सरकारने कोविशील्ड लसीचे एक कोटी दहा लाख डोस पुरवण्यासाठी सीरम इन्स्टिट्यूटला ऑर्डर दिल्यानंतर सीरम इन्स्टिट्यूटकडून आजपासून ही लस पाठवण्यास सुरुवात झाली आहे.




आज पहाटे साडेचारच्या सुमारास सीरम इन्स्टिट्यूटमधून 'कोव्हिशील्ड'चे डोस घेऊन तीन कंटेनर बाहेर पडले. तत्पूर्वी, नारळ फोडून कंटेनरची पूजा करण्यात आली. पुणे परिमंडळ ५ च्या पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांना हा मान मिळाला. हार, फुले वाहून कंटेनरची पूजा करण्यात आली. यावेळी उपस्थितांनी 'गणपती बाप्पा मोरया' असा गजर केला. यावेळी पुणे परिमंडळ ५ च्या पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की, "कोरोना वॅक्सिनची पहिली बॅच पोलिसांच्या सुरक्षेत पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया येथून रवाना झाली आहे."




'कोव्हिशील्ड'चे हे कंटेनर विमानतळावर सुरक्षित पोहोचले असून तिथून ते निश्चित स्थळी पाठवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पुणे विमानतळ प्रशासनानं त्याबाबतचे व्हिडिओ ट्विटरवर शेअर केले आहेत. पुण्यातून कोव्हिशिल्ड लस देशातील १३ शहरांत पाठवण्यात येणार आहे. त्यात औरंगाबाद, अहमदाबाद, दिल्ली, चेन्नई, बेंगळुरू, कोलकाता, कर्नाल, विजयवाडा, हैदराबाद, लखनऊ, चंदीगड, भुवनेश्वर, गुवाहाटी या शहरांचा समावेश आहे.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121