निवृत्त अधिकाऱ्याला झालेली मारहाण हा शिवसेनेच्या गुंडागर्दीचा पुरावा!

    12-Sep-2020
Total Views | 158
sanjay nirupam_1 &nb


शिवसेनेचे ओझे कधीपर्यंत सहन करणार?; संजय निरुपम यांचा पक्षाला सवाल


मुंबई : कांदिवली इथे राहणारे माजी नौदल अधिकारी मनोज शर्मा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर असलेले व्यंगात्मक कार्टून फॉरवर्ड केले म्हणून त्यांच्या घरात घुसून शिवसैनिकांकडून मारहाण करण्यात आली. यावरून विरोधकांनी शिवसेनेवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. मात्र महाविकास आघाडी सरकारमध्ये सहभागी असलेल्या काँग्रेसच्या नेत्याने शिवसेनेवर घणाघाती टीका केली.


शिवसेनेत बदल झालेला नसून आजही गुंड पार्टीच आहे, निवृत्त अधिकाऱ्याला झालेली मारहाण हा शिवसेनेच्या गुंडागर्दीचा पुरावा आहे, अशी घणाघाती टीका काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी केली. ही सरकारची पुरस्कृत गुंडगिरी आहे. शिवसेनेचे ओझे काँग्रेस कधीपर्यंत सहन करणार आहे हे विचारायला हवे, अस्व म्हणत त्यांनी पक्षाला घरचा आहेर दिला. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी आपला संताप व्यक्त करत शिवसेनेवर टीकास्र सोडले.






यावेळी निरुपम म्हणाले की, अधिकाऱ्याला केलेली मारहाण ही सरकार पुरस्कृत गुंडगिरी आहे. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना राज्य सरकार, पोलिसांकडून अभय दिले जात असून, ही अतिशय चिंताजनक बाब आहे. त्यामुळे शिवसेनेचे पितळ उघडे पडत आहे. शिवसेना गुंडा पार्टी असून आजही त्यांचा गुंडगिरी करण्यावरच विश्वास आहे. जे कालच्या घटनेवर स्पष्ट दिसले आहे, असे संजय निरुपम यांनी म्हटले आहे. तर, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, ज्यांना शिवसेनेसोबत सत्तेत बसण्यामध्ये धन्यता वाटत आहे. त्यांना शिवसेनेचे ओझे काँग्रेस कधीपर्यंत सहन करणार आहात हे विचारायला हवे, असे म्हणत त्यांनी आपला संताप व्यक्त केला. .







अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121