शांततेच्या नोबेलसाठी डोनाल्ड ट्रम्प यांचे नामांकन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Sep-2020
Total Views |

Donald Trump_1  
 
नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कासाठी नामांकन मिळाले आहे. २०२१च्या पुरस्कारांसाठी त्यांचे नाव नामांकनाच्या यादीत आहे. इस्रायल आणि संयुक्त अरब अमिरात या दोन्ही देशांसोबत केलेल्या ऐतिहासिक शांतता करारामुळे त्यांना शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी नामांकन देण्यात आले आहे. या करारामुळे दोन्ही देशातील जवळपास ७२ वर्षांचे वैर संपले.
 
 
युएई आणि इस्रायलमधील संबंध सुधारण्यासाठी ट्रम्प यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे असे ख्रिश्चन यांनी नोबेल पुरस्कारासाठी ट्रम्प यांच्या नावाचे समर्थन करताना सांगितले आहे. दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी यापूर्वी अनेकदा नोबेल पारितोषिकाबद्दल आपले मत व्यक्त केले होते. तसेच, नोबेल पारितोषिक न मिळाल्याबद्दल नाराजीही बोलून दाखवली होती.
 
 
खासदार ख्रिश्चन टायब्रिंग-गजेडे यांनी सांगितले की, “इस्रायल आणि संयुक्त अरब अमिरातीमध्ये शांतता करार होणे ही खूप मोठी बाब आहे. जागतिक शांततेसाठी हे खूप मोठी पाउल आहे. त्याशिवाय, आतापर्यंत शांततेचा नोबेल पुरस्कार मिळालेल्या विजेत्यांपेक्षाही अधिक महत्त्वाचे कार्य ट्रम्प यांनी केले आहे.”
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@