मुकेश अंबानी आता 'बिग बाझार किंग'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Aug-2020
Total Views |

Mukesh Ambani Kishor Biya
 
 



मुंबई : रिलायन्स इंडस्ट्रीजची उपकंपनी रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेडतर्फे शनिवारी फ्युचर ग्रुपच्या घाऊक, किरकोळ, लॉजिस्टीक्स आणि वेअरहाऊस व्यावसाय खरेदी केला. रिलायन्स रिटेल आणि फ्युचर समुहात २४ हजार ७१३ कोटी रुपयांचा करार झाला. ३१ मार्च २०१९ पर्यंत फ्युचर ग्रुपवर १० हजार ९५१ कोटींचे कर्ज होते. ३० सप्टेंबर २०१९ रोजी ते कर्ज १२ हजार ७७८ कोटी इतके झाले होते. बिग बाझारची 'सबसे सस्ता सबसे अच्छा' ही टॅगलाईन गाजल्याने ओळख मिळाली होती.
 
 
 
रिलायन्स रिटेल व्हेंचर लिमिटेडतर्फे ही घोषणा करण्यात आली आहे. दोन्ही कंपन्यांमध्ये झालेल्या करारानुसार हा करार एका योजनेअंतर्गत करण्यात आला आहे. ज्यात भविष्यात व्यावसाय करणाऱ्या काही कंपन्या भविष्यात विलिन करण्यात येणार आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, फ्युचर ग्रुप घाऊक आणि किरकोळ क्षेत्रातील व्यापार रिलायन्सची सहाय्यक कंपनी रिलायन्स रिटेल अॅण्ड फॅशन लाईफस्टाईलमध्ये बदलण्यात येणार आहे.
 
 
रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेडच्या संचालक ईशा अंबानी यांनी भारतात आधुनिक रिटेल व्यावसायात पुढे महत्वाची भूमीका निभावणार असल्याचे म्हटले आहे. छोटे व्यापारी, किराणा स्टोर्स यांना बड्या ब्रॅण्ड अंतर्गत व्यावसाय करता येईल, असेही त्या म्हणाल्या. रिलायंस इंडस्ट्रीजने किरकोळ बाजारात ३ कोटी किराणा स्टोअर्स आणि १२ कोटी शेतकऱ्यांना या मंचाशी जो़डण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
 
 
 
फ्यूचर ग्रुपच्या घाऊक आणि किरकोळ व्यापाराच्या वितरण साखळीतील बाजारावर नियंत्रण मिळवल्यानंतर रिलायन्सची पकड आणखी मजबूत होणार आहे. या करारानंतर रिटेल स्टोअर्सचे क्षेत्र १८ हजारांपर्यंत वाढू शकते. कंपनीचा एकूण महसुल २६ हजार कोटी रुपयांपर्यंत वाढणार आहे. रिलायन्सकडे एकूण बाजारपेठेपैकी एक तृतियांश हिस्सा असणार आहे.
 
 
साडीचे व्यापारी ते रिटेल किंग
 
 
साड्यांच्या पारंपारीक व्यापारात असलेल्या मारवाडी कुटूंबात जन्मलेले किशोर बियाणी यांनी १९८७मध्ये पँटलूनची सुरुवात केली होती. निधीच्या चणचणीमुळे आदित्य बिर्ला समुहाने २०१२ हे विकत घेतले. यानंतर कोलकात्याहून बियाणी यांनी बिग बाझारची सुरुवात केली होती. किफायतशीर किंमत आणि दर्जेदार वस्तूंमुळे लोकप्रिय होत गेलेल्या बिग बाझारला कमी वेळात देशवासीयांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@