गुजरातमध्ये IFSC स्थापन करण्याचा निर्णय सोनियांच्या आदेशाने !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-May-2020
Total Views |
Sonia Gandhi Sharad Pawar
 
 


जाणते शरद पवार 'तेव्हा' सभागृहात नव्हते का?


मुंबई : IFSC केंद्र गुजरातला उभारण्याचा निर्णय हा आत्ताचा नसून २०११ मध्येच तत्कालीन युपीए सरकारच्या काळात सोनिया गांधींच्या आदेशाने घेण्यात आल्याची माहिती निर्मला सितारामण यांनी राज्यसभेत एका प्रश्नाला देण्यात आलेल्या उत्तरात दिली होती. राष्ट्रावादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार सभागृहात नव्हते का, असा प्रश्न भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी विचारला आहे.




आ. भातखळकर म्हणाले, "गुजरातमध्ये IFSC स्थापन करण्याचा निर्णय युपीए सरकारने २०११मध्ये सोनिया गांधींच्या आदेशाने घेतला होता. राज्यसभेत दिलेल्या उत्तरात निर्मला सीतारामन यांनी ही माहिती दिली. त्यावेळी 'जाणते' शरद पवार सभागृहात नव्हते का? की वयोमानामुळे विस्मरण झाले आहे?, असा टोला त्यांनी लगावला आहे. IFSC केंद्र महाराष्ट्रातच उभारण्यात यावे, अशी मागणी शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे केली आहे. यावरून भातखळकर यांनी पवारांवर टीका केली आहे.






@@AUTHORINFO_V1@@